नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं. त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्यांनी आपला फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे. त्या नेहमी आरोग्यला पोषक अशा रेसिपींचे व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम व युट्यूब चॅनेलवर शेअर करत असतात. नुकताच ऐश्वर्या नारकरांनी होळीनिमित्त शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या नारकर त्यांच्या युट्यूब चॅनेलवर फिटनेस व विविध रेसिपींचे व्हिडीओ शेअर करत असतात. अभिनेत्रीने होळीनिमित्त आरोग्याला पोषक ठरणारा एक खास पदार्थ बनवला आहे. याची रेसिपी ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

हेही वाचा : “अजित पवारांना गुरगुरताना बघितलंय पण, अमित शाहांपुढं…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “लवकरच…”

ऐश्वर्या नारकरांनी होळीसाठी स्पेशल ‘मखाना चुरमा’ बनवला आहे. मखाना भाजून त्याची पेस्ट करून ‘मखाना चुरमा’ बनवला जातो. यामध्ये अभिनेत्री मखाण्यासह सुकामेवा, खजुर इत्याही पदार्थांचं एकत्रित मिश्रण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला “होली स्पेशल, तुम्ही सुद्धा हा पदार्थ जरूर करून पाहा” असं कॅप्शन दिलं आहे.

ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर “खूप सुंदर”, “कधी यायचं तुमच्या हातचं खायला”, “फिटनेसचं रहस्य आलं समोर”, “उत्तम ताई” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार अभिनेत्री स्वरा भास्कर? ‘या’ पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याची चर्चा

दरम्यान, याशिवाय ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या झी मराठीवरील मालिकेत रुपाली ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar shares holi special recipe video on instagram sva 00