Aishwarya Narkar : अलीकडच्या काळात सोशल मीडियाची तुफान क्रेझ निर्माण झाली आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय-काय चालूये हे जाणून घेण्यासाठी त्यांचे प्रत्येक चाहते उत्सुक असतात. मोठमोठे सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॉलोअर्सच्या संपर्कात राहतात. मात्र, काही वेळा या सोशल मीडियामुळे अनेक कलाकारांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा, आक्षेपार्ह कमेंटचा सामना करावा लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक अभिनेत्रींनी अशाप्रकारे आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्या युजर्सबद्दल नाव घेऊन, कमेंट्सवर जिथल्या तिथे रिप्लाय देऊन संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. असाच काहीसा अनुभव ऐश्वर्या नारकरांना सुद्धा आला. त्या नवनवीन व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर नेहमीच शेअर करत असतात. त्यांच्या अशाच एका फोटोवर नेटकऱ्याने आक्षेपार्ह कमेंट केली आहे.

हेही वाचा : ‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…

ऐश्वर्या नारकरांनी नेटकऱ्याला सुनावलं

संबंधित नेटकऱ्याने अतिशय खालच्या दर्जाची कमेंट केल्याने अभिनेत्रीने थेट याचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ऐश्वर्या हा स्क्रीनशॉट शेअर करत लिहितात, “आई आणि बायकोवरून म्हणताय का?? सगळे सारखे नसतात शिंदे… आडनावमागे तर लय पुण्याई आहे. तुमचं काय असं झालंय?? महिलांचा आदर करा” अभिनेत्रीने ( Aishwarya Narkar ) या संबंधित नेटकऱ्याला पोस्टमध्ये टॅग सुद्धा केलं आहे.

ऐश्वर्या नारकर नेहमीच अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्या युजर्सला सडेतोड उत्तर देत असतात. पण, जे फॉलोअर्स कायम त्यांच्या कामाला प्रोत्साहन देतात अशा लोकांना कमेंट्समध्ये उत्तर देऊन त्या आभार देखील मानतात. नुकताच अभिनेत्रीने युट्यूबवर १ लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. याची पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने त्यांच्या सर्व चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हेही वाचा : मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”

ऐश्वर्या नारकरांनी नेटकऱ्याला सुनावलं ( Aishwarya Narkar )

हेही वाचा : एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या ( Aishwarya Narkar ) कामाबद्दल सांगायचं झालं, मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar slams netizen who writes bad comments on actress recent photo sva 00