Aishwarya Narkar : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमुळे सध्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर चांगल्याच चर्चेत आहे. यापूर्वी त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली म्हणजे विरोचकाचं पात्र साकारत होत्या. नेत्राने मालिकेत विरोचकाचा वध केल्यावर आता मालिकेत शतग्रीवची एन्ट्री झाली आहे. शतग्रीवचं पात्र देखील ऐश्वर्या नारकर साकारत आहे. सध्या मालिकेत त्यांचा आधीपेक्षा काहीसा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. याशिवाय त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) इन्स्टाग्रामवर विविध रील्स, पोस्ट, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं नेहमीच मन जिंकून घेतात. मात्र, अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. या सगळ्या ट्रोलर्सला अभिनेत्री स्पष्ट शब्दांत उत्तर देत असल्याचं पाहायला मिळतं.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “रितेशला ठरवून कुणाचा अपमान करता येत नाही”, लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट; म्हणाली, “त्याच्या डोळ्यात…”
ऐश्वर्या नारकरांनी नुकताच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर करत एका नेटकऱ्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. संबंधित युजरने अभिनेत्रीला सुरुवातीच्या दिवसात काहीसे बरे पण त्यानंतर काही आक्षेपार्ह मेसेज केले होते. या सगळ्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे. यातील एका मेसेजमध्ये “तुम्ही आता म्हाताऱ्या झालात” असं देखील नेटकऱ्याने म्हटलं आहे. याचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्रीने संबंधित युजरला चांगलंच सुनावलं आहे.
ऐश्वर्या नारकरांचं नेटकऱ्याला उत्तर
“प्रवास बघा आपला… डोक्यावर आपटत गेलात की काय… आपली लायकी काय… आपण बोलतो काय…” असं म्हणत ऐश्वर्या नारकरांनी या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. तसेच या पोस्टबरोबर अभिनेत्रीने आक्षेपार्ह मेसेज केल्याचं संपूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग देखील जोडलं आहे.
शेअर केले स्क्रीनशॉट
हेही वाचा : “रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya Narkar ) यापूर्वी असंख्य नेटकऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तरं देत आपली बाजू मांडली आहे. त्यांना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्रीने आपला एक वेगळा ठसा या मनोरंजनविश्वात निर्माण केला आहे. सध्या त्यांच्या शतग्रीवच्या पात्राला नकारात्मक भूमिका असूनही प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे.