मागच्या काही दिवसांपासून मराठी अभिनयसृष्टीतील ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर हे जोडपं खूप चर्चेत आहे. हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर इन्स्टाग्रामवरून शेअर करत असतात. असाच एक व्हिडीओ ऐश्वर्यांनी अविनाश यांच्याबरोबर शेअर केला होता. यावर कमेंट करत एका युजरने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्या युजरला ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला. त्यात दोघेही ‘रुप तेरा मस्ताना’ या गाण्यावर पोज देताना दिसत आहेत. “कपल गोल्स, बदल तुमच्या आयुष्याचा भाग आहेत…. फक्त चांगले बनण्याचा प्रयत्न करा…एकमेकांशी संवाद साधा… सर्व शेअर करा… बोलून मोकळे व्हा.. एकमेकांचे मित्र व्हा.. एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत साथ द्या… तुम्ही पती आहात किंवा पत्नी हे महत्त्वाचे नाही. आयुष्य तुम्हाला नक्कीच सुखाच्या वाटेवर घेऊन जाईल…प्रयत्न करून पाहा,” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं होतं.

या व्हिडीओवर एका युजरने ‘म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा’ अशी कमेंट केली होती. त्याला उत्तर देत ऐश्वर्या म्हणाल्या, “बुद्धी गंजेल असे विचार करून, तुमच्या घराण्यात म्हातारचळ लागण्याचा रोग आहे वाटतं. जगून घ्या, गेलात तर दुसऱ्यांना बोलण्यात सगळंच राहून जाईल.. म्हातारचळचा अर्थही बघून घ्या जरा.. बुद्धी भ्रष्ट,” असं उत्तर देत त्यांनी हसण्याचा इमोजी टाकला.

Aishwarya Narkar reply troller
ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोलरला दिलेलं उत्तर

दरम्यान, या व्हिडीओवर इतर युजर्सनी कमेंट करत नारकर दाम्पत्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे. तसेच “वयाचा प्रश्न येतो कुठे..ते दोघे मस्त आयुष्य जगतात हे महत्वाचे आहे…मी काही पंचवीस तीस वर्षाचे म्हातारे पाहीलेत..आणि पावसात भिजणारे अंशी वर्षाचे तरुणही पाहीलेत.अविनाश व ऐश्वर्या नारकर हे खऱ्या अर्थाने तरुण आहेत,” अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Story img Loader