चित्रपट, मालिका, नाटक अशा कलाकृतींमधून येणारे कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या भेटीला येताना दिसतात. सोशल मीडियावरदेखील या कलाकारांचे हजारो-लाखो चाहते असलेले पाहायला मिळतात. डान्स, विनोदी रील, व्हिडीओ अशा माध्यमांतून हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. अनेकदा महत्त्वपूर्ण संदेशही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कलाकार देतात. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर(Aishwarya Narkar) या त्यांच्या कलाकृतीबरोबर सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या दिसतात. अनेकविध माध्यमातून त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आता त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण संदेश शेअर केला आहे.

कमीत कमी वर्षातून एकदा तरी…

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी आरोग्याबाबत संदेश देत म्हटले, “एक आठवण करून द्यायची होती, आपल्या कामाच्या व्यापामध्ये, आपल्या संसाराच्या सगळ्या धबडग्यामध्ये, आपण स्वत:कडे लक्ष द्यायचं विसरूनच जातो. मग आपल्या शरीरात काय कमी आहे, काय जास्त आहे, शरीर आपल्याला काय सांगू पाहतंय हे आपल्या लक्षातच येत नाही. स्त्रियांमध्ये हार्मोनल बदलांमुळे शरीर खूप गोष्टींसाठी अॅडजेस्ट होत असतं. तर या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार आहे का, काही उद्भवणार आहे का? हे कळायला पाहिजे असेल तर आपण त्याची आताच काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच सहा महिन्यातून एकदा किंवा कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्या शरीराचं रुटीन चेकअप हे केलं गेलं पाहिजे. ही गोष्ट कृपया विसरू नका आणि रूटीन चेकअप अवश्य करून घ्या. तंदुरूस्त राहा आणि आनंदी राहा”, असे म्हणत ऐश्वर्या नारकरांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की स्वत:वर प्रेम करा, काळजी घ्या, तुम्ही महत्त्वाचे आहात.

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Dhanashree Verma break silence on Divorce Rumours
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”

ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर अनेकदा योगा सेशनचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. याबरोबरच, अभिनेत्री सोशल मीडियावर अभिनेते व पती अविनाश नारकर यांच्याबरोबर डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. चाहतेदेखील त्यांच्या व्हिडीओंना पसंती दर्शवतात. ऐश्वर्या नारकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे, वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी रूपाली, शतग्रीव, विरोचक, मैथिली अशा विविध भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले. महत्त्वाचे म्हणजे मैथिली ही भूमिका वगळता त्यांच्या इतर भूमिका या नकारात्मक होत्या. मात्र, त्यांची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना आवडल्याचे पाहायला मिळाले. आता त्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader