Aishwarya Rai – Salman Khan : ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या राय आणि सलमान खान या दोघांचे सूर जुळले होते. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची आणि ऑफस्क्रीन मैत्रीची सर्वत्र चर्चा रंगली होती. दोघेही एकमेकांना जवळपास तीन वर्षे डेट करत होते. मात्र, काही काळाने दोघेही वेगळे झाले. ऐश्वर्याच्या आधी सलमान अभिनेत्री सोमी अलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. तिने नुकतीच ‘झूम टीव्ही’ला मुलाखत दिली. यावेळी सोमीने, ऐश्वर्याने सलमानच्या जिममध्ये येण्यास सुरुवात केली तेव्हाचं वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमी अलीने या मुलाखतीत ‘हम दिल दे चुके सनम’ ( Aishwarya Rai – Salman Khan ) या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा सांगितला. अभिनेत्री म्हणाली, “चित्रपटाचं शूटिंग चालू असताना मी सलमानला फोन केला होता. पण, त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर मी संजय लीला भन्साळींना फोन केला ते म्हणाले, ‘सलमान आता तुमच्याशी बोलू शकत नाही. कारण, तो एका सीनसाठी शूट करतोय’ मी त्यांना लगेच विचारलं, जर, सलमान शूट करतोय…तर, तुम्ही त्याला डायरेक्ट का नाही करत आहात? तुम्हाला माझा फोन उचलण्यासाठी वेळ कसा मिळाला? माझे प्रश्न ऐकल्यावर ते काहीच बोलले नाहीत.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ निघाली अमेरिकेला! विमानतळावर एकत्र जमले कलाकार; ११ शहरांमध्ये होणार शो, जाणून घ्या…

काय म्हणाली सोमी?

ऐश्वर्याने जिममध्ये येण्यास सुरुवात केल्यावर त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली का? असा प्रश्न विचारताच सोमी म्हणाली, “नाही! ऐश्वर्या आणि सलमान ‘हम दिल दे चुके सनम’च्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. मला सेटवर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून याबाबत माहिती मिळाली होती. तेव्हाच मला माहीत होतं की, यांचं नातं अजून चांगलं होणार आहे आणि जेव्हा ऐश्वर्याने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या जिममध्ये येण्यास सुरुवात केली तेव्हा मला जाणवलं आता हे सगळं सोडून मी वेगळं होण्याची वेळ आली होती.”

हेही वाचा : देशमुखांच्या सुनांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप! जिनिलीयाने मोठ्या जाऊबाईंसह शेअर केला खास व्हिडीओ, कॅप्शनने वेधलं लक्ष

अभिनेत्री सोमी अलीचा ऐश्वर्या – सलमानबद्दल खुलासा ( Aishwarya Rai – Salman Khan )

दरम्यान, पुढे ऐश्वर्या व सलमान यांचं २००२ मध्ये ब्रेकअप झालं. कालांतराने ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेकबरोबर लग्न केलं. या जोडप्याला आराध्या नावाची मुलगी आहे. तर, सलमान अद्याप अविवाहित आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai started coming to salman khan gym somy ali talked about their love story sva 00