Singham Again New Song : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर ‘सिंघम अनेग’मध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ५ मिनिटांचा ट्रेलर पाहून प्रेक्षक अवाक झाले होते. या जबरदस्त ट्रेलरने प्रेक्षकांमधील उत्सुकता अजूनच वाढवली. अशातच आता ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील पहिलं-वहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर २४ तासांत १३८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. त्याचप्रमाणे चित्रपटातील पहिल्या गाण्यादेखील प्रेक्षकांच्या प्रतिसाद मिळत आहे. ‘जय बजरंगबली’ असं गाण्याचं नाव असून प्रदर्शित होताच सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील हे नवं गाणं प्रेक्षकांच्या मनात भगवान हनुमानाच्याप्रती भक्तीची भावना जागृत करताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: सिद्धार्थ जाधव लवकरच येतोय धिंगाणा घालायला; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

‘जय बजरंगबली’ या गाण्याची सुरुवात सिंघम म्हणजे अजय देवगणपासून होताना दिसत आहे. अजय देवगण म्हणतोय, “गूगलवर बाजीराव सिंघम टाइप करून बघ मग कळेल तुझा बाप कोण आहे. ज्याचा तिरस्कार करतो किंवा ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी तो कुठेही जाऊ शकतो.” त्यानंतर गाण्यात रणवीर सिंहची एन्ट्री होते; ज्याला हनुमानच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. रणवीर हनुमानाची गदा घेऊन शत्रूंना मारताना दिसत आहे. तसंच इतर व्यक्तिरेखा देखील गाण्यात दाखवल्या गेल्या आहेत.

‘सिंघम अगेन’ चित्रपटातील ‘जय बजरंगबली’ गाणं श्रीकृष्ण, करीमुल्लाह, अरुण कौंडिन्य यांनी गायलं आहे. तर थमन एसने संगीतबद्ध केलं आहे. तसंच स्वानंद किरकिरे यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा – “विषय लीलया पेलला”, ‘पाणी’ चित्रपटावर प्रतिक्रिया देताना महेश मांजरेकरांनी आदिनाथ कोठारेचं केलं कौतुक अन् आजकालच्या अभिनेत्रींना दिला सल्ला

हेही वाचा – “डोळ्यातून बांध फुटला…”, वडील आणि भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर झाली भावुक, म्हणाली…

दरम्यान, रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’बरोबर टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट धुमाकूळ घालणार? हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे.