गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक नवनवीन कलाकार मालिका विश्वात पदार्पण करत आहेत. अशातच ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून घरोघरी पोहोचलेला अभिनेता संकेत कोर्लेकरच्या बहिणीने देखील छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. यासंदर्भात अभिनेत्याने पोस्ट लिहून माहिती दिली आहे.

संकेतच्या सख्ख्या बहिणीचं नाव उमा असून तो तिच्याबरोबर विविध विषयांवर आधारित रील्स बनवतो. या भावा-बहिणीची जोडी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. आता भावा पाठोपाठ उमाने सुद्धा छोट्या पडद्यावर आपली छाप उमटवली आहे.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स

हेही वाचा : “लोक म्हणतात ही जोकर आहे”, सारा अली खानने ट्रोलिंगवर केलं भाष्य; म्हणाली, “मला मूर्ख, चुकीचं…”

लाडक्या बहिणीसाठी खास पोस्ट शेअर करत संकेत लिहितो, “उमा तू पहिल्यांदा टीव्हीवर दिसलीस आणि नेमकं मी तिथे तुला बघायला नाही आहे. पण, आनंद ह्याच गोष्टीचा आहे की, तुझ्या स्वप्नांना उशिरा का होईना पण सुरुवात झाली. स्वतःच्या जीवावर माझीही मदत न घेता ही लहानशी भूमिका मिळवलीस. तुझा उत्तम अभिनय लवकरच योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि तुला अजून छान भूमिका मिळेल ज्यातून तुला तुझं खरं पोटेनशियल लोकांना दाखवता येईल.”

हेही वाचा : Video : “प्रेमिका…”, प्रभूदेवाच्या व्हायरल गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स, धकधक गर्लची नेटकऱ्यांना भुरळ

संकेत पुढे म्हणतो, “आज चित्रपटसृष्टीत माझं १२ वं वर्ष सुरु आहे ह्या हक्काने तुला सांगेन की उतू नको मातू नको हातातलं काम अर्ध्यात सोडू नको. खूप शुभेच्छा.. माझी मैत्रीण मानसी सुरेशला खूप प्रेम कारण १० दिवस तिने उमाची खूप काळजी घेतली त्यात माझा मित्र आकाश नलावडेचं देखील कौतुक की सेटवर त्याने उमाची पुरेपूर काळजी घेतली.”

दरम्यान, संकेतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आतापर्यंत त्याने ‘हम बने तुम बने’, ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘टकाटक’ चित्रपटात देखील काम केलं आहे.

Story img Loader