मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षय केळकर सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाला आहे. मूळचा मुंबईचा असलेला अक्षय एका सामान्य कुटुंबातून आला आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री करतानाच त्याने त्याचा आतापर्यंतचा प्रवास सर्वांना सांगितलं होता. अक्षयचे वडील आजही रिक्षा चालवतात. नुकताच बिग बॉसच्या घरात अक्षयने त्याच्या ब्रेकअपचा किस्सा शेअर केला आणि त्याचवेळी आई- वडिलांचा अभिमान का वाटतो याचं खास कारणही सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय केळकरने बिग बॉसच्या घरात त्याचं पहिलं प्रेम त्याच्या आईने त्याला कसं मिळवून दिलं होतं हे सांगितलं. त्याचबरोबर ब्रेकअपचा किस्साही शेअर केला. अक्षय केळकरला नात्यातीलच कोणी एक मुलगी मेसेजेस पाठवत होती जे त्याच्या आईच्या निदर्शनास आले आणि त्याचबद्दल अक्षयने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना किस्सा सांगितला.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4 : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही…” बिग बॉसच्या घरात महेश मांजरेकरांचं वक्तव्य

अक्षय म्हणाला, “मी सुरुवातीला खूप लाजत असे. मुलींशी फारसा बोलत नसे आणि नात्यातली एक मुलगी मला मेसेज करत होती. मी ते मेसेजेस इग्नोर केले. त्यावेळी आई माझा फोन चेक करायची आणि आईने मात्र सांगितले कि, मुलगी तुला मेसेज करत आहे, तिला तू आवडत असावास. नात्यातील होती म्हणून मी तिच्या घरी रहायला गेलो. आमच्यात बरीच चर्चा झाली. तिने मी तिला आवडत असल्याची कबुली दिली. सगळं छानचं होतं. पण ते प्रेम टिकलं नाही. ब्रेकअप झाला. पण माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईने जुळवून दिलं होतं.”

अक्षय पुढे म्हणाला, “एका इव्हेंटला गेलो असता मला विचारण्याच आलं काय सल्ला देशील मी म्हणालो “मी सल्ला नाही देणार पण, माझे आई बाबा नववी नापास आहेत, रिक्षावाला घरं सांभाळतो आहे, इतका फ्रिडम दिला दोन्ही मुलांना की ते बरोबर मार्गावर चालत आहेत. शिक्षित राहून अशिक्षित राहण्यापेक्षा अशिक्षित राहून शिक्षित राहणं गरजेचे आहे. एवढंच सांगेन.” हे सांगताना आई- बाबांची अभिमान वाटत असल्याचंही त्याने म्हटलं.

आणखी वाचा- “१२ तास प्रवास करून एका सीनसाठी…”, ‘बिग बॉस’च्या घरात अपूर्वा नेमळेकरने सांगितल्या ‘शेवंता’च्या आठवणी

दरम्यान बिग मराठीमध्ये अक्षय केळकरने एंट्री केल्यानंतर त्याला होस्ट महेश मांजरेकर यांनी ‘आता इथंपर्यंत कसा आलास?’ असा प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना अक्षय केळकरने “मी बाबांच्या रिक्षातून आलोय. मी एक अभिनेता असलो तरी माझे बाबा आजही रिक्षा चालवतात. मी कितीही कमावत असलो तरी त्यांना रिक्षा चालवायचीच आहे असं ते सांगतात.” असं म्हटलं होतं. यानंतर महेश मांजरेकर यांनी त्याच्या बाबांचं कौतुक करत बिग बॉसच्या मंचावर बोलावलं होतं.