अभिनेता अक्षय केळकरने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचं विजेतेपद जिंकलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अक्षयने बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर त्याचं खूप कौतुक झालं. त्यानंतर तो सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिग बॉसच्या प्रवासाबद्दल अक्षयने बरेच खुलासे केले आहेत. पण आता त्याने बिग बॉस आणि महेश मांजरेकर यांच्याबद्दल मजेदार आणि कुणालाही माहीत नसलेला किस्सा शेअर केला आहे.
बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर अक्षयने नुकत्याच रेडिओ सीटी मराठीच्या आरजे शोनालीला दिलेल्या मुलाखतीत बिग बॉसच्या घरातले मजेदार किस्से सांगितले. बिग बॉसच्या घरात अक्षय केळकरला होस्ट महेश मांजरेकर यांच्याकडून बराच ओरडा बसला आहे आणि तेवढंच त्याच्या खेळाचं कौतुकही झालं आहे. अशात एक मजेदार गोष्ट बिग बॉसच्या घरात घडायची ज्याबद्दल प्रेक्षकांना माहीत नव्हतं. ते गुपित आता अक्षयने उघड केलं आहे.
आणखी वाचा- “तुझ्या रुखवतातला ट्रॉफीचा हट्ट…”, बहिणीच्या लग्नानंतर अक्षय केळकरची खास पोस्ट
अक्षय केळकर म्हणाला, “मांजरेकर सर जेव्हा केव्हा मला खूप ओरडायचे तेव्हा ते मला एक गोष्ट नेहमी सांगायचे, अक्षय तू खूप निःपक्ष खेळतोस आणि त्या बदल्यात तुला काय हवं मला सांग. तर ते मला दर शनिवारी गुपचूप मोदक पाठवायचे. जे टीव्हीवर दाखवण्यात आलं नाही. पण हे गुपित होतं. त्यांचं माझ्यावर एक वैयक्तिक प्रेम होतं. भले ते माझ्यावर कितीही चिडले तरीही.” तर अशा रितीने अक्षयने बिग बॉसच्या घरातील एक मोठं गुपित सर्वांसमोर सांगितलं आहे.