रमा आणि अक्षय ही पात्रे आज घराघरात पोहोचली आहेत. ‘मुरांबा’ (Muramba) मालिकेतील या पात्रांनी प्रेक्षकांना भुरळ घातल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत आता नवे वळण आले आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रमा आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘मुरांबा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अक्षयने रमाला प्रपोज केल्याचे पाहायला मिळत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला रमा आणि अक्षय एका रस्त्यावर आहेत. अक्षय रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या थांबवतो. रमा त्याला म्हणते, “काय करताय तुम्ही?” अक्षय रमाला म्हणतो, मी रेवाशी ठरलेलं लग्न मोडणार आहे आणि त्याच मांडवात मी तुझ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार आहे. असे म्हणत असताना तो रमासमोर गुडघ्यावर बसतो आणि तिला फुलांचा गुच्छ देतो. त्यावर रमा म्हणते, “दुसऱ्यांदा लग्न करायचं म्हणताय, पण एकदाही प्रपोज केलं नाही तुम्ही. अक्षय म्हणतो, म्हणजे? रमा म्हणते, “मला मागणी घाला. ते ही अगदी फिल्मी. रमाने असे म्हटल्यानंतर अक्षय तिथे असलेल्या एका कारवर चढतो आणि म्हणतो, “आय लव्ह यू रमा. माझ्याशी पुन्हा एकदा लग्न करशील?” त्यावर ती मानेने होकार देते. तिथे जमा झालेले लोक टाळ्या वाजवतात. अक्षय कारवरून खाली येतो आणि रमाला अंगठी घालतो. यावेळी ‘का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो’, हे गाणे ऐकायला मिळत आहे. त्यानंतर रमाला अक्षय उचलून घेतो.

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “रमा-अक्षयच्या गोड नात्याची पुन्हा नव्याने होणार सुरुवात…”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सुरुवातीला रमा आणि रेवा जिवलग मैत्रिणी असतात. अक्षयला रेवा आवडते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. मात्र, रेवाचे अथर्व नावाच्या मुलावर प्रेम असते. रमा आणि अक्षयचे लग्न होते. हळहळू रमा आणि अक्षय यांच्यामध्ये मैत्री होते, त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. दुसरीकडे, अथर्व रेवाचा छळ करतो. रमा व अक्षय रेवाला सोडवतात आणि घरी आणतात. त्यानंतर रेवाला अक्षयबरोबर लग्न करण्याचा मोह होतो. ती त्यासाठी अनेक प्रयत्न करते. मात्र, तिच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. रेवा अक्षयला मारण्याचा प्रयत्न करते, यामध्ये अक्षयला डोक्याला मार लागतो. तो रेवाचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी काहीही आठवत नसल्याचे नाटक करतो. त्यानंतर तो रेवाबरोबर प्रेम असल्याचेदेखील नाटक करतो. आजी आणि शशिकांत मुकादम म्हणजेच अक्षयचे वडील त्यांचे लग्न ठरवतात. हे नाटक खूप दिवसांपासून सुरू आहे. आता मात्र अक्षयने रमाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: “त्रासदायक लोकांना…”, अर्जुन कपूरने ब्रेकअप बद्दल खुलासा केल्यानंतर मलायका अरोराने केलेली पोस्ट

आता रेवाबरोबर ठरलेले लग्न मोडून अक्षय रमाबरोबर कसे लग्न करणार, रेवाचे सत्य सर्वांसमोर आणणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Story img Loader