Akshaya Deodhar And Hardeek Joshi : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे राणादा आणि पाठकबाई यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत हार्दिक जोशीने ‘राणादा’ तर, अंजली पाठक ही व्यक्तिरेखा अक्षया देवधरने साकारली होती. या मालिकेने जवळपास साडेचार वर्षं ( २०१६ – २०२१ ) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिका संपल्यावर सगळे कलाकार आपआपल्या मार्गावर वळले पण, खऱ्या आयुष्यात हार्दिक-अक्षयाचे सूर जुळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिकने अक्षयाच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घातली होती. यानंतर दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद दिला होता. हार्दिक-अक्षया २ डिसेंबर २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आज या जोडप्याच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने या दोघांनी घरगुती सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : ‘पुष्पा २’ अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ठरला ‘वाईल्ड फायर’, दिल्लीत १८०० तर मुंबईत तब्बल ‘इतक्या’ रुपयांना होतेय तिकीट विक्री

लग्नाला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने हार्दिक-अक्षयाने ( Akshaya Deodhar ) मुव्ही डेटचं आयोजन केल होतं. यावेळी दोघांनी पेस्ट्री ( लहान केक ) सुद्धा आणल्या होत्या. याचे फोटो या जोडप्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तर, हार्दिकने आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हार्दिक जोशी लिहितो, “ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न केलं, तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही…एवढा तो दिवस माझ्यासाठी खास होता आणि आपलं लग्न सुद्धा माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. तू माझी Soulmate, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. आय लव्ह यू… माय लव्ह ( प्रेम ), माझी राणी…अक्षरा देवधर तुला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

हेही वाचा : Video : दुआ लिपाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांना दिलं जबरदस्त सरप्राइज, सुहाना खान व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

हार्दिक जोशी व अक्षया देवधरची पोस्ट ( Akshaya Deodhar And Hardeek Joshi )

हेही वाचा : नवरी नटली…; ‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “सगळे स्वत:च्या धुंदीत…”

हार्दिकच्या पोस्टवर अभिजीत खांडकेकर, तेजस्विनी लोणारी यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत या जोडप्याला ( Akshaya Deodhar ) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अक्षयाने सुद्धा नवऱ्यासाठी “प्रेम भी तू, दोस्त भी तू, एक भी तू, हजार भी तू, गुस्सा भी तू, माफी भी तू, जिंदगी के सफ़र में काफ़ी भी तू…” अशी खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya deodhar and hardeek joshi celebrate 2nd wedding anniversary actor shares romantic post sva 00