अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरला हार्दिक-अक्षयाचा विवाहसोहळा पुण्यात थाटात संपन्न झाला. सध्या हार्दिकच्या घरी अक्षयाच्या मंगळागौरीची तयारी सुरु आहे. सोमवारी अभिनेत्रीने मंगळागौरीच्या मेहंदी सोहळ्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. आता नुकतेच हार्दिक-अक्षयाने मंगळागौर समारंभाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हेही वाचा : “पैसे अन् काम काहीच नव्हतं”, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाली, “तो काळ मानसिक…”
हार्दिक-अक्षयाने “मंगळागौर पूजन” असे कॅप्शन देत या सोहळ्यादरम्यानचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. अक्षयाने या सोहळ्यासाठी खास सोनेरी रंगाची साडी नेसली होती. हार्दिकच्या नावाची मेहंदी, सोनेरी रंगाची साडी, हातात बांगड्या असा संपूर्ण शृंगार अभिनेत्रीने केला होता. हार्दिकने बायकोच्या साडीच्या रंगाला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता.
हेही वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटात अलका कुबल यांनी साकारली आहे प्रभावशाली भूमिका, जाणून घ्या…
श्रावण महिन्यात दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. लाडक्या सूनेच्या पहिल्या मंगळागौरीसाठी हार्दिकच्या घरी विशेष तयारी केल्याचे पाहायला मिळाले. अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही एकत्र मंगळागौरीचे पूजन करताना दिसत आहेत. या फोटोंवर हार्दिक-अक्षयाच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘अहा’, ‘नजर न लगे.. सदा रहो सुखी…’, ‘खूप सुंदर जोडी’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
हेही वाचा : “लय भारी!”, अंशुमन विचारेने बायकोसह रिक्रिएट केलं अशोक सराफ-किशोरी शहाणेंचं गाणं, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
दरम्यान, गेल्यावर्षी २ डिसेंबरला पुण्यात पारंपारिक पद्धतीने हार्दिक आणि अक्षयाचा विवाह सोहळा पार पडला होता. या दोघांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम केले होते. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिका संपल्यावर काही महिन्यांनी दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.