मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी गेल्यावर्षी २ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. पुण्यात पारंपारिक पद्धतीने हार्दिक आणि अक्षयाचा विवाह सोहळा पार पडला होता. आता परंपरेनुसार यंदा अक्षयाची पहिली मंगळागौर असणार आहे. श्रावण महिन्यात मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. पहिल्या मंगळागौरीसाठी हार्दिक-अक्षयाची घरी विशेष तयारी सुरु आहे. याची खास झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
अक्षया देवधर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या हार्दिक-अक्षयाच्या घरी पहिल्या मंगळागौरीची तयारी सुरु आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या मेहंदीच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षयाच्या हातावरच्या मेहंदीवर “ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम…”, “ओम नम: शिवाय” असे खास मंत्र लिहिण्यात आले आहेत.
हेही वाचा : ‘मैं हूं ना’ प्रदर्शित झाल्यावर फराह खानने मागितलेली सुश्मिता सेनची माफी; अभिनेत्रीने सांगितलं कारण
अक्षयाने मंगळागौरीच्या मेहंदी सोहळ्यादरम्यान खास जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मेहंदी काढतानाचा संपूर्ण व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दोन जणी तिच्या हातावर सुरेख मेहंदी काढताना दिसत आहेत. यावर “अक्षयाची मंगळागौर” असेही लिहिण्यात आले आहे.
हेही वाचा : “दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा
हार्दिक आणि अक्षयाने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम केले होते. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिका संपल्यावर काही महिन्यांनी दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता अक्षयाच्या पहिल्या मंगळागौरीची चर्चा सुरु आहे. तिने शेअर केलेल्या मेहंदीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी असंख्य प्रतिक्रिया देत या जोडप्याचे कौतुक केले आहे.