‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या केळवणांना सुरुवात झाली. त्यापाठोपाठ आता अक्षयाने बॅचलर पार्टीही साजरी केली आहे. त्यावेळचा एक हटके फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ठरलं! ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक

अक्षया देवधर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिची ही बॅचलर पार्टी अगदीच हटके होती. या बॅचलर पार्टी तिने चक्क दाक्षिणात्य थीम ठेवली होती. इतकंच नाही तर नुकताच तिने या बॅचलर पार्टीच्या वेळचा एक व्हिडीओ पोस्ट केला.

यात तिने तिच्या मैत्रिणींसह ‘रा रा रेड्डी’ या अतिशय गाजत असलेल्या गाण्यावर दक्षिणात्य स्टाईलने ठेका धरलेला पहायला मिळत आहे. यावेळी तिने आणि तिच्या मैत्रिणींनी अगदी दाक्षिणात्य पद्धतीने लुंगी परिधान केली आहे. तसंच केसात गजरा माळलेलाही दिसत आहे.

आणखी वाचा : Video : दापोलीच्या समुद्रकिनारी राणादा-पाठकबाईंचा रोमान्स, मराठमोळ्या कपलची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

याआधी हार्दिकने त्याच्या केळवणाचे फोटो शेअर करत ती दोघं लवकरच श्री. व सौ. होणार असल्याचे संकेत दिले होते. आता अक्षयानेही बॅचरल पार्टीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे यांच्या लग्नाची तारीख काय आहे हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच व्यवसायिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा होत आहेत. ही दोघं लवकरच ‘चतुरचोर’ या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya deodhar celebrated her bachelor party with friends rnv