‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच ते विवाहबंधनात अडकले. आता जोशी आणि देवधर कुटुंबियांनी मिळून अक्षयाची पहिली मंगळागौर थाटामाटात साजरी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षयाच्या या मंगळागौरीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत. राजेशाही थाटात तिची मंगळागौर साजरी झाली. यासाठी एक हॉल बुक करण्यात आला होता. दुपारी त्यांनी मंगळागौरीची पूजा केली तर रात्री खेळ खेळले.

आणखी वाचा : अक्षया देवधरची नवी सुरुवात! पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

अक्षयाची मंगळागौर सर्वत्र चर्चेचा विषय ठरली असली तरी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे ते या मंगळागौरीच्या रुखवताने. या मंगळागौरीमध्ये छानसं रुखवतही मांडण्यात आलं होतं. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : जेजूरीला जाताना अक्षया देवधरने जपली परंपरा, नेसली आईची २५ वर्षं जुनी साडी, पाहा खास झलक

यामध्ये ढोल वाजवणारे स्त्री-पुरुष, फेर धरलेल्या महिला, फुगडी घालणाऱ्या महिला, घागर फुंकत असलेली महिला, सुपलं घेऊन मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या महिला, बस फुगडी खेळणाऱ्या महिला दिसत आहेत. त्याचबरोबर एका सुपावर एका स्त्रीचा सुंदर मुखवटाही काढला आहे. तर आता तिच्या मंगळागौरीतील या रुखवताचं खूप कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya deodhar celebrates her first manglagaur photos of decoration gets viral rnv