Akshaya Deodhar Comeback in Zee Marathi New Serial : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचा पहिला भाग नुकताच पार पडला. या सोहळ्यादरम्यान वाहिनीकडून एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. याचं नाव आहे ‘लक्ष्मी निवास’. गेल्या काही दिवसांपासून ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नेमकं कोण-कोण झळकणार याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. अखेर मालिकेची स्टारकास्ट आता समोर आहे.

आयुष्यभर आपल्या मुलांच्या इच्छेसाठी झटणाऱ्या एका वयोवृद्ध जोडप्याच्या आयुष्यावर ही गोष्ट बेतलेली आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेते तुषार दळवी या दोघांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास या भूमिका हे दोघंही साकारणार आहेत. श्रीनिवास हे एका कार कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत असतात, तर लक्ष्मी गृहिणी असतात. आपल्या मुलींचं थाटामाटात लग्न व्हावं आणि आपण हक्काचं घर बांधावं असं यांचं स्वप्न असतं. या स्वप्नादरम्यानचा प्रवास ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
shivani rangoli birthday mother in law mrinal Kulkarni writes special post
लाडक्या सुनेचा वाढदिवस! मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट; म्हणाल्या, “काहीतरी गंमत…”
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”

हेही वाचा : “गावी कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही” नकारात्मक कमेंट करणाऱ्या युजरला अंकिताने सुनावलं; म्हणाली, “मी मुद्दाम…’

लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या मुलीची भूमिका मालिकेत अक्षया देवधर ( Akshaya Deodhar ) साकारणार आहे. ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याला या तिघांनी उपस्थिती लावत या मालिकेविषयीची माहिती प्रेक्षकांना दिली होती. या कौटुंबिक मालिकेत प्रेक्षकांना दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

अक्षया देवधर करणार पुनरागमन

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अक्षयाने छोट्या पडद्यावर सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं. यामध्ये तिने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती. राणादा मालिकेत तिला ‘पाठकबाई’ अशी हाक मारत असल्याने हळुहळू महाराष्ट्रातील घराघरांत अक्षयाला ‘पाठकबाई’ ही नवीन ओळख मिळाली. या मालिकेने निरोप घेतल्यावर अक्षयाने काही दिवस ‘हे तर काहीच नाय’ या शोमध्ये काम केलं. त्यानंतर ती काही चित्रपटांमध्ये झळकली.

मात्र, आता अक्षया ( Akshaya Deodhar ) खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या जोडीला यामध्ये अभिनेता कुणाल शुक्ला महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : Zee Marathi Awards 2024 : सर्वोत्कृष्ट सासू अन् सून ठरली ‘ही’ एकच अभिनेत्री! तर, सर्वोत्कृष्ट मुलगा ठरला…

Akshaya Deodhar Comeback in Zee Marathi New Serial
अक्षया देवधर नव्या मालिकेत झळकणार ( Akshaya Deodhar Comeback in Zee Marathi New Serial )

अक्षया नव्या मालिकेत झळकणार हे समजताच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात सुरूवात केली आहे. ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका नेमकी कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती वाहिनीने दिलेली नाही. मात्र, लवकरच या नव्या मालिकेची तारीख अन् वेळ जाहीर केली जाईल असं सांगण्यात येत आहे.

Story img Loader