मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी व अक्षया देवधर लग्नानंतर एकत्र वेळ घालवत आहेत. त्यांच्या लग्नाला २ जानेवारीला एक महिना पूर्ण झाला. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं.

हार्दिक-अक्षया आता गोव्याला पोहोचले आहेत. लग्नाच्या एक महिन्यानंतर हार्दिक व अक्षयाने सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांनी काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून गोव्यातील समुद्रकिनाऱ्याचा व्हिडीओही शेअर केला आहे. हार्दिकनेही गोव्यातील एका हॉटेलचा फोटो शेअर केला आहे.

hardeek joshi akshaya deodhar goa (1)

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून हार्दिक व अक्षया घराघरात पोहोचले. राणादा-पाठकबाईंची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरली होती. ते खऱ्या आयुष्यातही विवाहबद्ध झाल्याने चाहतेही खूश आहेत.

hardeek joshi akshaya deodhar goa (2)

२ डिसेंबरला हार्दिक-अक्षयाने लग्नगाठ बांधत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हार्दिक लवकरच ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.