हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही नवविवाहित जोडी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची क्रेझ काही केल्या संपत नाही आहे. त्यांच्या मेहंदी, हळदी, संगीत व शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलाविश्वातील अक्षया-हार्दिक हे नवीन जोडपं लग्नानंतर कॉफी डेटला गेले होते. त्यानंतर आता हार्दिक अक्षयाला घेऊन रोड ट्रिपवर गेला आहे. त्यांच्या लॉंग ड्राइव्हचा व्हिडीओ अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये हार्दिक गाणी ऐकत गाडी चालवताना दिसत आहे. अक्षया-हार्दिक त्यांच्या लग्नानंतरचा एकमेकांबरोबर वेळ घालवत आनंदी असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>>रिक्षा चालकाच्या बाजूला बसून मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रवास; पोस्ट शेअर करत म्हणाली “आपली चौकट…”

हेही वाचा>> …अन् तेजस्विनी लोणारीच्या घरी पोहोचली ‘बिग बॉस’ची ट्रॉफी; फोटो शेअर करत अभिनेत्रीची भावूक पोस्ट

हार्दिक-अक्षयाने २ डिसेंबरला विवाहबद्ध होत नवीन आयुष्याला सुरुवात केली. पुण्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती.

हेही वाचा>> Video: व्हॅनिटी वॅनमधून उतरताच चाहत्यांनी केली तुफान गर्दी अन्…; ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्रीने शेअर केला अनुभव

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या हार्दिक-अक्षयाने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव या चित्रपटात हार्दिक पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसला. आता वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya deodhar hardeek joshi goes on road trip after marriage photo viral kak