‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर शुक्रवारी (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले. या दोघांचे मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रम, लग्न, रिसेप्शन सोहळ्याचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. आता या दोघांचा घरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : “गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ…” राणादाने घेतलेला उखाणा ऐकून पाठकबाई लाजल्या अन्…

लग्नानंतर हे सेलिब्रिटी कपल त्यांच्या नव्या आयुष्याचा आनंद घेताना दिसत आहेत. लग्नानंतरचा सेल्फीही दोघांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता. आता त्यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ

लग्नानंतर हार्दिकच्या घरी सत्यनारायण पूजा होती. या पूजेला हार्दिक व अक्षया बसले होते. दरम्यान दोघांनीही पूजेसाठी खास लूक केला होता. अक्षयाने गुलाबी रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती. तसेच नाकात नथ घातली होती.

आणखी वाचा – Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या, पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा

हार्दिकने पिवळ्या रंगाचा कुर्ता, धोतर व टोपी घातली होती. दोघं पूजा करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक व अक्षयाच्या नव्या आयुष्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya deodhar hardeek joshi home video couple first puja after wedding see details kmd