हार्दिक जोशी व अक्षया देवधर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. राणादा-पाठकबाई या रील लाइफ जोडीने २ डिसेंबरला खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नानंतरही अनेक दिवस हार्दिक-अक्षयाची चर्चा आहे. नुकतंच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटवर घेऊन गेला होता. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. फोटोबरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. ठाण्यातील स्टारबक्समध्ये अक्षया-हार्दिकची कॉफी डेट रंगली. त्यांच्या कॉफी डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा>>Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>>“हिंदीत कितीही मोठं काम केलं तरी…” स्वप्निल जोशीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अक्षया-हार्दिकने सप्तपदी घेत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. पुण्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या विवाहसोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती.

हेही वाचा>> Video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून अक्षया-हार्दिक घराघरात पोहोचले. अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. हार्दिक मालिकांबरोबर चित्रपटातही झळकला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत तो दिसला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya deodhar hardeek joshi on coffee date after wedding photos viral kak