मराठी अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी २ डिसेंबरला लग्न केलं. लग्नानंतर ते दोघेही सातत्याने चर्चेत आहे. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील लोकप्रिय रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नानंतर या दोघांनी हळदी, मेहंदीपासून ते देवदर्शनापर्यंत बरेच फोटो शेअर केले आहेत.
अक्षया देवधरने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक आणि अक्षया दोघंही दिसत आहे. यात अक्षया आणि हार्दिकला हळदी कुंकू लावताना दिसत आहे. त्यानंतर त्या दोघांनी मिळून एकत्रित एका वृक्षाचे रोपण केले आहे.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी
यावेळी त्या दोघांनीही एकाच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यात अक्षयाने पिवळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. त्याबरोबरच तिच्या हातात हिरवा चुडा पाहायला मिळत आहे. तसेच पायात जोडवीही दिसत आहेत. तर हार्दिकने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. यात ते दोघेही फारच गोड दिसत आहेत.
आणखी वाचा : Photos: मराठी कलाकारांच्या मंगळसूत्रांच्या हटके स्टाइल, डिझाईन पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकल्याने चाहतेही आनंदी आहेत. अक्षया-हार्दिकच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.