Akshaya Deodhar – Hardeek Joshi Marriage : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी नावारुपाला आली. राणादा व पाठकबाई या त्यांच्या पात्राने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चर्चेचा विषय ठरली. पण खऱ्या आयुष्यातही हार्दिक व अक्षया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. आता या दोघांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा – Akshaya Hardeek Wedding : “दाजींना घेऊन येतोय” मित्रच राणादाला पाठकबाईंच्या घरी घेऊन गेला, अक्षया म्हणते…
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक व अक्षयाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. हार्दिक व अक्षया दोघंही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे लग्नाच्या तयारीचे व्हिडीओ व फोटो पोस्ट करत आहेत. मित्र व अभिनेता अमोल नाईकने हार्दिकच्या हळदी कार्यक्रमाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ
हार्दिकला आता अक्षयाच्या नावाची हळद लागली आहे. हार्दिकने त्याच्या हळदीसाठी पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला आहे. तसेच त्याने मुंडावळ्या बांधल्या आहेत. हळदी कार्यक्रमासाठी हार्दिकच्या घरी खास डेकोरेशन करण्यात आलं आहे.
आणखी वाचा – केळीचे खांब, फुलांनी सजला राणादा-पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप, मेहंदी कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू
हळदीसाठी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसंच हार्दिक व अक्षया असं नावही खास पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. तसेच कुटुंबियांसह मित्र-मंडळीही हार्दिकची हळद एण्जॉय करताना दिसत आहेत.