‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर आज (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडत आहे. या नवविवाहित जोडप्याला सगळेच जण शुभेच्छा देत आहेत. दरम्यान हार्दिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंची लगीनघाई, आईच्या हट्टापायी थेट अक्षयाच्या घरी लग्नासाठी मागणी घालायला गेला होता हार्दिक जोशी अन्…

हार्दिक व अक्षयाने मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रम अगदी बॉलिवूड स्टाइलने आयोजित केला होता. हळदी कार्यक्रमाला या दोघांनी मनसोक्त खर्च केला. त्यानंतर हार्दिक व अक्षयाच्या संगीत कार्यक्रमाला सुरुवात झाली.

पाहा व्हिडीओ

या सेलिब्रिटी कपलच्या संगीत कार्यक्रमाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान हार्दिक व अक्षया काही व्हिडीओंमध्ये रोमँटिक डान्स करताना दिसले. तर हार्दिकने चक्क स्वतःच्याच संगीत कार्यक्रमाला लावणी नृत्य सादर केलं.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा – Video : नऊवारी साडी, मंगळसुत्र, नथ, जोडवी, हिरवा चुडा; नवरीबाईचा थाटच न्यारा, पाठकबाईंच्या राणाने नेसलं धोतर

“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा” या लावणीवर हार्दिकने ठेका धरला. हार्दिकला लावणी करताना पाहून अक्षयाही थक्क झाली. तर त्याच्या या लावणी नृत्याला उपस्थितांनीही बराच प्रतिसाद दिला. हार्दिकचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस पडत आहे.