‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर आज (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक आणि अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आज पुण्यात पारंपारिक पद्धतीने हार्दिक आणि अक्षयाचा विवाह सोहळा पार पडला. याचे बरेच व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता खुद्द वधूनेच म्हणजेच अक्षयानेच एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले. या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा ही भूमिका साकारली होती. तर अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली. राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. आता ही रिल जोडी रिअल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकली आहे. त्यानंतर आता अक्षया देवधरने एक खास पोस्ट केली आहे. ती सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

अक्षया देवधरने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत अक्षया आणि हार्दिक एकमेकांकडे गोड पाहताना दिसत आहे. हा फोटो मंगळसूत्र घातल्यानंतर काढलेला आहे. तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही नवविवाहित दाम्पत्याप्रमाणे दिसत आहे. यात पाठकबाई लाजल्याचे पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या फोटोत हार्दिक हा अक्षयाला भर मांडवात किस करत असल्याचे दिसत आहे.

या फोटोला अक्षयाने फारच हटके कॅप्शन दिले आहे. “रील ते रिअल… जादू कायम” असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याबरोबर तिने #अहा असा हॅशटॅग शेअर करत हार्ट इमोजी शेअर केला आहे.

आणखी वाचा : Akshaya Hardeek Wedding Live : “नांदा सौख्यभरे…” अक्षया देवधर-हार्दिक जोशीचा विवाहसोहळा संपन्न

दरम्यान हार्दिक अक्षयाने पुण्यात पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. या लग्नाच्या विधींसाठी त्यांनी खास लूक केला होता. अक्षयाने लाला रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. तसेच या लूकसाठी तिने परिधान केलेले दागिने तर विशेष लक्षवेधी आहेत.

पाहा व्हिडीओ –

हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. त्यावर त्याने क्रिम रंगाचा कुर्ता परिधआन केला आहे. यांचे अनेक फोटोही व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya deodhar hardeek joshi wedding actress share marriage photos instagram post viral nrp