‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी नावारुपाला आली. राणादा व पाठकबाई या त्यांच्या पात्राने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चर्चेचा विषय ठरली. पण खऱ्या आयुष्यातही हार्दिक व अक्षया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. आता या दोघांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा – केळीचे खांब, फुलांनी सजला राणादा-पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप, मेहंदी कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक व अक्षयाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अक्षयाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे लग्नापूर्वीचे विधी सुरू झाले असल्याचं सांगितलं होतं. आता हार्दिक-अक्षयाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे.
मेहंदी कार्यक्रमासाठी हार्दिक अक्षयाच्या घरी गेला आहे. अक्षया व हार्दिकचा मित्र अभिनेता अमोल नाईक याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो हार्दिकबरोबर दिसत आहे.
आणखी वाचा – मुंडावळ्या बांधून नवरी बाई तयार, हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या लग्न विधींना सुरुवात, पाहा खास झलक
अमोलने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “दाजी को लेकर आ रहा हू मैं.” यावर अक्षयानेही हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक हातात मेहंदीचे कोन घेऊन उभा असलेला दिसत आहे. तर फुलांनी मेहंदी असं नाव लिहिलेलं या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तसेच दोघांनीही ‘#अहा’ हा हॅशटॅग लग्नासाठी तयार केला आहे.