‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. हे कपल नेहमीच एकमेकांबरोबरचे खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतं. अशातच आज हार्दिक जोशीचा वाढदिवसानिमित्त अक्षयाने त्याच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा : स्वतः आलिया भट्ट नव्हे तर ‘ही’ व्यक्ती सांभाळते तिचे आर्थिक व्यवहार, मुलाखतीदरम्यान केला खुलासा

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच

अक्षयाने फोटो आणि छोट्या व्हिडिओ क्लिप्स एकत्र करुन तयार करण्यात आलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या वहिडिओची सुरुवात एका छोट्या व्हिडीओ क्लिपने होते, ज्यात हार्दिक चहा पिता पिता मजेशीर हावभाव करताना दिसत आहे. त्यानंतर हार्दिक आणि अक्षयाचे काही रोमँटिक फोटो दिसत आहेत.

हा स्पेशल व्हिडीओ पोस्ट करत अक्षयाने हार्दिकला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, “माझ्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तू माझ्यासाठी जग आहेस. तू माझे कायमचे मनोरंजन आहेस. तू माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्तम गोष्ट आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

हेही वाचा : Video: पाठकबाईंची हटके बॅचलर पार्टी, लुंगी नेसून धरला प्रसिद्ध गाण्यावर ताल

हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. हे दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. अलीकडेच हार्दिकने त्याच्या बहिणींनी त्याच्यासाठी केलेल्या केळवणाचा फोटो शेअर केला होता. तर काही दिवसांपूर्वी अक्षया तिच्या मैत्रिणींसोबत बॅचेलर पार्टी करताना दिसली.

Story img Loader