‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर हिने रिल लाइफ पार्टनर हार्दिक जोशीबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाला २ जानेवारीला एक महिना पूर्ण झाला. लग्नानंतर महिन्याभरातच अक्षयाने मोठा खुलासा केला आहे.
हार्दिकशी विवाहबद्ध झाल्यानंतर एका महिन्याने अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने हार्दिकशी लग्नगाठ बांधण्यापूर्वीची त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे. अक्षया म्हणते, “मला थोडी याची कल्पना आधीच आली होती. काय घडतंय किंवा समोरचा काय बोलणार आहे, याचा अंदाज येतोच. पण आता हार्दिक असं काही बोलेल, लग्नासाठी विचारेल असं मला वाटलं नव्हतं”.
“आधी मी यासाठी तयार नव्हते. त्यामुळे मला उत्तर द्यायला थोडा वेळ लागला. पण मलाही माहीत होतं की मी हो म्हणणार आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडलं”, असंही पुढे अक्षया म्हणाली. अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे.
हेही वाचा>>“…म्हणून मी गरोदर असल्याचं सगळ्यांपासून लपवलं”, आलिया भट्टचा खुलासा
हेही वाचा>> “मला विजेता…”, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादेचं मोठं वक्तव्य
हार्दिकनेही अक्षयाबरोबर लग्न करण्याच्या त्याच्या इच्छेबाबत या व्हिडीओत खुलासा केला आहे. तो म्हणाला, “मालिका संपल्यानंतर लग्नाचं वय झालं आहे, असं मला घरुन सांगण्यात आलं. अक्षयाला लग्नासाठी विचार, असं आई म्हणाली. त्यामुळे आमच्या लग्नाचं क्रेडिट माझ्या आईला जातं. मी प्रपोज केल्यानंतर अक्षयाने लगेच उत्तर दिलं नाही. तिने सहा महिन्यांचा वेळ घेतला. मालिका संपल्यानंतर आमचा जीव रंगला”.
हेही वाचा>>“जवळ येऊ नकोस…”, रितेश देशमुखशी फोनवर बोलत असताना जिनिलीयाबरोबर नेमकं काय घडलं?
अक्षया-हार्दिक ही रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यातही विवाहबद्ध झाल्याने चाहतेही आनंदी आहेत. लग्नानंतरचा वेळ अक्षया-हार्दिक एकमेकांबरोबर आनंदाने घालवत आहेत.