अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही टीव्हीवरील लोकप्रिय जोडी काही महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली. दोघंही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि नेहमीच एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने पाठकबाई म्हणजेच अक्षय देवधरने एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

अक्षय देवधर आणि हार्दिक जोशी मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. दोघंही अनेकदा एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. आताही अक्षया देवधरने तिच्या इन्स्टाग्रामवर हार्दिकबरोबरचा सुंदर रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने खूपच रोमँटिक कॅप्शनही दिलं आहे. अक्षयाच्या या पोस्टवर हार्दिकने कमेंट केली आहे.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Fans and netizens reaction on tejashri Pradhan exit from premachi goshta serial
“खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”

आणखी वाचा- “मला आर्मीत करिअर करायचं होतं पण…” राणादाने सांगितलं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यामागचं खरं कारण

अक्षया देवधरने इन्स्टाग्रामवर हार्दिक बरोबरचा फोटो शेअर करताना एक हिंदी शायरी पोस्ट केली आहे. तिने लिहिलं, “मेरे बस में नहीं अब हाल-ए-दिल बयां करना, बस ये समझ लो लफ्ज कम मोहब्बत ज्यादा है!” अक्षयाच्या या फोटोवर कमेंट करताना हार्दिकनेही ‘हार्ट’ इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. अक्षयची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

आणखी वाचा- Dream Girl 2 Teaser: बहुचर्चित ‘ड्रीम गर्ल २’चा टीझर प्रदर्शित, स्त्री वेशातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?

दरम्यान अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी डिसेंबर २०२२ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. या दोघांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील मालिकेत एकत्र काम केलं होतं आणि याच मालिकेच्या सेटवर झालेली या दोघांची मैत्री पुढे प्रेमात बदलली. मात्र याबद्दल या दोघांनी कधीच जाहीर भाष्य केलं नाही. अखेर मे २०२२ रोजी त्यांचा साखरपुडा झाला त्यावेळी चाहत्यांना पहिल्यांदा त्यांच्या डेटिंगबद्दल कळलं होतं. रील लाइफमधली ही जोडी खऱ्या आयुष्यातही आता पती-पत्नी झाले आहेत.

Story img Loader