‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच ते विवाहबंधनात अडकले. नुकतीच जोशी आणि देवधर कुटुंबियांनी मिळून अक्षयाची पहिली मंगळागौर थाटामाटात साजरी केली. तिची ही मंगळागौर चांगलीच चर्चेत आली होती. तर आता या मंगळागौरीदरम्यानचे काही न पाहिलेले फोटो अक्षयाने शेअर केले आहेत.

अक्षयाच्या या मंगळागौरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आले. राजेशाही थाटात तिची मंगळागौर साजरी झाली. यासाठी एक हॉल बुक करण्यात आला होता. दुपारी त्यांनी मंगळागौरीची पूजा केली तर रात्री खेळ खेळले. मंगळागौरीचा खेळ खेळताना अक्षयाने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती तर हार्दिकने देखील सोनेरी रंगाचा झब्बा आणि त्याखाली हिरव्या रंगाचं धोतर दिसलं होतं.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल

आणखी वाचा : जेजूरीला जाताना अक्षया देवधरने जपली परंपरा, नेसली आईची २५ वर्षं जुनी साडी, पाहा खास झलक

अक्षयाने सोशल मीडियावर या कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो आतापर्यंत शेअर केले होते. तर आज अक्षयाने तिचे आणि हार्दिकचे मंगळागौरीला काढलेले आणखी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यातील एका फोटोत अक्षया आणि हार्दिक एका सोफ्यावर बाजुबाजूला बसलेले दिसत असून अक्षया हार्दिकला टाळी देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अक्षया हार्दिकच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये ते दोघं एकमेकांकडे पाहून पोज देताना दिसत आहेत.

हेही वाचा : झिम्मा-फुगडीचा देखावा, घागर फुंकणारी महिला अन्…; अक्षया देवधरच्या मंगळागौरीचं पारंपरिक रुखवत पाहिलंत का?

आता अक्षयाने शेअर केलेले हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात त्यावर नेतकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एकाने लिहिलं, “बेस्ट जोडी.” तर दुसरा म्हणाला, “देवा या दोघांना कायम सुखी ठेव.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “खरं प्रेम.” तर आणखी एक जण म्हणाला, “राणादा-अंजली… आमची सगळ्यात आवडती जोडी.” त्या दोघांचे हे फोटो आता सगळ्यांना चांगलेच आवडले आहेत.

Story img Loader