‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नसोहळ्याची कायमच चर्चा रंगताना दिसते. शुक्रवारी २ डिसेंबरला त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. पुण्यात ते दोघेही विवाहबद्ध झाले. अगदी पारंपरिक पद्धतीने अक्षया आणि हार्दिकचा लग्नसोहळा पार पडला आहे. यावेळी अक्षयाने हार्दिकसाठी खास उखाणा घेतला होता. त्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. यानंतर आता तिने या उखाण्यामागची गोष्ट सांगितली आहे.

अक्षयाने लग्नाच्यावेळी हार्दिकसाठी खास उखाणा घेतला होता. हा उखाणा तिने स्वत: तयार केला होता. नुकतंच हार्दिक जोशी आणि अक्षयाने साम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षयाला लग्नाचा उखाणा कसा तयार केला? याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तिने यामागील किस्सा सांगितला.
Video : राणादाने केला सरप्राईज डान्स, पाठकबाईंनी पाहताच क्षणी जोडले हात

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?

अक्षया देवधर काय म्हणाली?

“लग्नात उखाणा घ्यायचा असतो हे प्रत्येकालाच ठाऊक आहे. मलाही तो घ्यावा लागणार होता. पण मला गुगल करुन किंवा त्याच पद्धतीचा उखाणा घ्यायचा नव्हता. मला थोडा वेगळ्या पद्धतीचा उखाणा घ्यायचा होता. रुचा आपटे आणि मुक्ता मी या दोघींनाही याबद्दल सांगितले. रुचाही माझ्यापेक्षा जास्त चांगलं लिहिते. त्यामुळे मी तिला सांगितलं की मला उखाणा तयार करायचा आहे, तू काहीतरी कर, रुचाने चार ओळीही लिहिल्या.

लग्नाआधी ८ दिवस आम्ही रात्री ११ वाजता कॉफीशॉपमध्ये भेटलो होतो. त्यावेळी आई मला बाहेर फिरण्यावरुन ओरडलीदेखील होती. मी उखाणा तयार करणार आहे, असं कोणालाच सांगितले नव्हते. कारण जोपर्यंत तो तयार होत नाही, तोपर्यंत ते सांगण्यात अर्थ नाही.

त्यानंतर पाऊण तासात आम्ही तिघींनी, यमक जुळवून वैगरे उखाणा तयार केला. रुचाही आमच्या मालिकेबद्दलही बऱ्यापैकी माहिती होती, त्यामुळे आम्ही विचार करुन करुन त्या ओळी लिहिल्या. त्यानंतर रुचाने मला नीट करुन तो दिला”, असे अक्षयाने यावेळी सांगितले.

अक्षयाने घेतलेला खास उखाणा

खरंतर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त,
पण संधी चालुन आली आहे तर होईन म्हणते व्यक्त.
कामासाठी घर सोडून धरली वेगळी वाट,
प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट.
मग राणाजी राणाजी म्हणत दिवस गेले सरुन,
राणा सारख्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरुन.
तुझ्यात जीव रंगता रंगता वेळ आली निघायची,
कुठे तरी एक खात्री होती पुन्हा एकत्र भेटण्याची.
दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा,
अक्षयतृतीया मुहूर्त ठरला आमच्या साखरपुड्याचा.
उखाणं घेते म्हणत म्हणत कहाणी झाली सांगून,
आता घेते उखाणा ऐका कान देऊन.
उखाण्यासाठी विचार करुन शक्कल लढवलीये अशी,
माझंही नाव घेते तेवढ्यात अक्षया हार्दिक जोशी….

आणखी वाचा : Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : हळदीचा सोहळा ते लग्नाच्या विधी, खास मैत्रिणीने शेअर केलेला व्हिडीओ पाहिलात का?

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही विवाहबंधनात अडकल्याने चाहतेही खूश आहेत. लवकरच हार्दिक ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader