‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच ते विवाहबंधनात अडकले. तर ते नेहमीच टे सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. आता नुकतेच ते जेजूरील गेले होते. त्यादरम्यानचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत.
काल हार्दिक आणि अक्षयाने जेजूरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. त्यांच्या कुटुंबीयांबरोबर ते येथे गेले होते. तिथे गाभाऱ्यात जाऊन त्यांनी खंडोबाची पूजा केली. तर दर्शन घेऊन आल्यावर त्यांनी भंडाराही उधळला.
जेजूरीला खंडोबाच्या दर्शनाला जाताना अक्षयाच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याचं मुख्य कारण म्हणजे तिची इन्स्टाग्राम स्टोरी. जेजूरीला देवळात जाण्याआधी तिने एक इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली. यामध्ये तिने एक खास साडी नेसली. तिने तिच्या आईची २५ वर्षं जुनी केशरी रंगाची साडी नेसली. ती साडी २५ वर्षं जुनी असल्याची माहिती तिने स्वतः इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सांगितलं.
तर आता तिची ही इन्स्टाग्राम स्टोरी खूप चर्चेत आली आहे. तर याचबरोबर तिच्या या लूकचं तिचे चाहते कौतुक करत आहेत.