अक्षया देवधर व हार्दिक जोशीचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या दोघांच्या शाही विवाहसोहळ्याची बरीच चर्चा रंगली. तर कलाकारांसह चाहत्यांनीही अक्षया व हार्दिकवर शुभेच्छांचा वर्षाव केला. २ डिसेंबरला अक्षया व हार्दिकने लग्न करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. आता या दोघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. याचनिमित्त अक्षयाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – Video : “अभी तो पार्टी शुरू हुई है” म्हणत राणादा-पाठकबाईंचं जंगी सेलिब्रेशन, पार्टीमध्ये हार्दिक जोशी बेभान होऊन नाचला अन्…

अक्षया व हार्दिकने लग्नानंतर पहिल्यांदाच नववर्षाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. यादरम्यानेच काही फोटो व व्हिडीओ दोघांनीही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. सध्या दोघंही आपल्या सुखी संसारामध्ये रमले आहेत. लग्नाला एक महिना पूर्ण होताच अक्षया व हार्दिकने देवदर्शन केलं आहे.

अक्षयाने शेअर केलेल्या फोटोवरून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात हे दोघं गेले असल्याचं दिसत आहे. तसेच लग्नाला एक महिना पूर्ण झाला असल्याचं अक्षयाने म्हटलं आहे. या सेलिब्रिटी कपलने कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं.

आणखी वाचा – “अम्मा तुम्ही माझ्यासाठी…” शिझान खानच्या आईसाठी तुनिषा शर्माने रेकॉर्ड केलेली व्हॉईस नोट व्हायरल

यावेळी दोघांचाही पारंपरिक लूक पाहायला मिळाला. हार्दिकने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर अक्षयानेही त्याच रंगाचा ड्रेस घालणं पसंत केलं. दोघंही या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. शिवाय हार्दिकला कामामधून वेळ मिळताच हे नवविवाहित जोडपं हनिमूनला जाणार आहे.