Akshaya Deodhar – Hardeek Joshi Marriage: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले. सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली. पुण्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पाठकबाईंना घेऊन जाण्यासाठी थेट घोड्यावरुन राणादाची वरात आली होती. पारंपरिक वेशातील हार्दिक घोड्यावर बसून एकदम राजबिंडा दिसत होता. हार्दिकने वऱ्हाडी मंडळींसह वरातीत डान्सही केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> …अन् राणादाने भर मांडवात पाठकबाईंना केलं किस; अक्षया-हार्दिकच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल

हेही वाचा>>राणादा-पाठकबाई अडकले विवाहबंधनात; अक्षया-हार्दिकच्या सप्तपदीचा व्हिडीओ समोर

राणादा-पाठकबाईंनी विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नासाठी अक्षयाने खास हातमागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसत पारंपरिक लूक केला होता. त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हार्दिक-अक्षयाच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक होते. आता राणादा-पाठकबाई विवाहबंधनात अडकल्यानंतर चाहत्यांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  

हेही वाचा>>‘बिग बॉस मराठी’च्या घरात सिद्धार्थ जाधवची एन्ट्री; आता कोणता नवा ट्वीस्ट येणार?

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मेहंदी, हळदी व संगीत सोहळ्यातील फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता त्यांच्या लग्न सोहळ्यातील फोटोंनी चाहत्याचं लक्ष वेधून घेतले आहे.

Story img Loader