रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’चे १६वे पर्व जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शिव ठाकरे किंवा प्रियंका चौधरी यंदाच्या पर्वाचे विजेते ठरतील, अशी चर्चा असतानाच एमसी स्टॅनने ट्रॉफी जिंकली. एमसी स्टॅनने बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुणेकर असलेल्या अवघ्या २३ वर्षीय एमसी स्टॅनचा रॅपर बनण्याचा प्रवास सोपा नव्हता.
एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ तडवी आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. वयाच्या १२ व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केलं आहे. एमसीने अनेक गाणी गायली असली तरी यूट्यूबवर जवळपास २१ मिलियन व्ह्यूज मिळालेल्या ‘वाटा’ या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली. एमसी स्टॅनला भारताचा टुपॅक म्हटलं जातं.
एमसी स्टॅन हिप-हॉप इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. हिप-हॉपमध्ये येण्यापूर्वी तो बीट बॉक्सिंग आणि बी-बॉयिंग करत असे. एमसी स्टेन केवळ २३ वर्षांचा असून इतक्या कमी वयात तो कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. तो ‘बिग बॉस १६’ च्या प्रीमियरला ६०-७० लाख रुपयांचे हिंदी लिहिलेले नेकपीस आणि ८० हजारांचे शूज घालून आला होता. त्याने गेल्या तीन-चार वर्षांत इतकी लोकप्रियता मिळवली आहे. एमसी स्टेनची एकूण संपत्ती सुमारे ५० लाख आहे. त्याची गाणी आणि यूट्यूब आणि कॉन्सर्टमधून तो दरमहा लाखो रुपये कमावतो.
Bigg Boss 16 Trophy Price: सोनं व हिऱ्यांनी बनली आहे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी; किंमत वाचून व्हाल थक्क
एमसीचा जन्म पुण्यातील अत्यंत गरीब मुस्लीम कुटुंबात झाला. सुरुवातीला त्याला कुटुंबीय आणि लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले होते, कारण तो अभ्यासापेक्षा गाण्यावर आणि रॅपकडे जास्त लक्ष देत असे. एक काळ असा होता की स्टेनकडे पैसे नव्हते आणि त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागली. पण एमसी स्टॅनने हार न मानता संघर्षातून यश मिळवलं.
Photos: सिद्धार्थ-कियाराच्या ग्रँड रिसेप्शनला अवतरलं बॉलिवूड; कलाकारांचे खास लूक पाहिलेत का?
एमसी स्टॅनने ‘समझ मेरी बात को’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने DIVINE आणि EMIWAY सारख्या रॅपर्सचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचं गाणं व्हायरल झालं आणि स्टॅन लोकप्रिय झाला. नंतर, एमसी स्टॅनने अस्तगफिरुल्ला नावाचे एक गाणे रिलीज केले, ज्यामध्ये त्याने आपला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल भाष्य केलं होतं.