‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या एकता कपूरच्या लोकप्रिय मालिकेत मिहिर विराणीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविलेला अभिनेता अमर उपाध्याय हा अलीकडेच आपल्या या व्यक्तिरेखेशी संबंधित एका आठवणीबद्दल बोलला. मालिकेत मिहिरला मृत घोषित करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांना हा निर्णय आवडला नव्हता. हे पात्र इतके लोकप्रिय झाले होते की, चाहत्यांसह सेलिब्रिटींनीदेखील बालाजी टेलिफिल्म्सच्या कार्यालयात फोन करून नाराजी व्यक्त केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिहिरच्या मृत्यूनंतर घराबाहेर जमलेल्या महिला

अमर उपाध्यायने (Amar Upadhyay) ‘एंटरटेन्मेंट लाइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “त्या दिवशी सकाळीच माझ्या घराची बेल वाजली. मी दार उघडलं, तर गेटजवळ १५-२० महिला पांढऱ्या साड्या नेसून उभ्या होत्या. त्यांच्याकडे पाहून मला आश्चर्य वाटलं. मी विचारले, ‘तुम्ही अशा का आलात?’ त्यांनी उत्तर दिलं, ‘काही नाही.’ माझी आई घरातून हा सगळा प्रकार ऐकत होती. तिने बाहेर येऊन त्या महिलांना विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या, ‘मिहिर गेला आहे. त्यामुळे आम्ही…”

हेही वाचा…“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…

अमर यांच्या आईला हे ऐकून खूप राग आला. त्यांनी त्या महिलांना सुनावत म्हटले, “तुम्हाला अक्कल आहे का? त्याच मालिकेत निधन झालं आहे ! तुम्ही काय करताय? इथून आता लगेच जा ! तो माझा मुलगा आहे!” अमर यांनी सांगितले की, त्यांच्या आईला या प्रकारामुळे खूप राग आला होता.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मध्ये मिहिर विराणीची व्यक्तिरेखा संपल्यानंतर अमर उपाध्यायने २००१ मध्ये ही मालिका सोडली. मात्र, प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळे त्याने मालिकेत परत येण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये मालिकेत लीप घेत मिहीर विराणीची पुढची पिढी दाखवण्यात आली. आणि अमरने बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी मालिका कायमची सोडली. त्याच्या जागी इंदर कुमार याला घेतले गेले आणि त्यानंतर रोनित रॉयला मिहीरच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. रोनित रॉयने मालिकेचा शेवट होईपर्यंत मिहिर विराणीची भूमिका साकारली.

हेही वाचा…‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे

अमरचे बॉलीवूडमध्ये जाण्यासाठी प्रयत्न आणि पुन्हा टीव्हीमध्ये पुनरागमन

मालिकेनंतर अमर उपाध्यायने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्याने ‘एलओसी कारगिल’, ‘इट्स माय लाईफ’ व ‘कागज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या; पण त्याला टीव्हीवरील यशाची पातळी गाठता आली नाही. त्यामुळे त्याने पुन्हा टीव्हीकडे वळून ‘देश में निकला होगा चांद’, ‘साथियॉं – प्यार का नया अहसास’ व ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या मालिकांमध्ये कामे केली.

सध्याचा प्रवास

अमर उपाध्यायला अलीकडेच ‘भूल भुलैया २’ या चित्रपटात एका लहान भूमिकेत पाहिले गेले. या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, व तब्बू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा…सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…

अमर उपाध्याय याने साकारलेली मिहिर विराणीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कोरली गेली आहे. त्याची ही व्यक्तिरेखा आणि त्याला मिळालेले चाहत्यांचे प्रेम हे त्याच्या करिअरमधील महत्त्वाचे टप्पे ठरले.