Dr. Ambedkar Jayanti 2023 : १४ एप्रिल रोजी भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. नागरिकांसह सेलिब्रिटीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने “आपण आहोत, कारण ते होते…बाबासाहेब धन्यवाद,” असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमधून गौरव मोरेने आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबसाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन केलं आहे.

हेही वाचा>> “मला वैभव तत्ववादी आवडायचा” प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला “तिने मला…”

हेही वाचा>> “मला मुलगी आवडली तर…”, आकाश ठोसरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला “माझी हिंमत…”

गौरव मोरे हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो घराघरात पोहोचला. विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसावणाऱ्या गौरवने अल्पावधीतच मनोरंजनसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. गौरवने मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘हवाहवाई’ चित्रपटात गौरवने सिद्धार्थ जाधवसह स्क्रीन शेअर केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkar jayanti 2023 maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared special post kak