Raksha Bandhan 2024 : श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. हा महिना सुरू झाल्यानंतर अनेक सण साजरे केले जातात. आज बहीण-भावाच्या अतुट नात्याचा सण आहे तो म्हणजे रक्षाबंधन. बहीण आपलं रक्षण करणाऱ्या भावाला राखी बांधून हा सण साजरा केला जातो. यानिमित्ताने कलाकार मंडळी देखील रक्षाबंधन सण साजरा करताना दिसत आहेत. तसंच सोशल मीडियावर फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत आहेत. ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशालीने ( Amit Bhanushali ) मालिकेच्या सेटवर रक्षाबंधन साजरे केले. याचा फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मधून घराघरात पोहोचलेला अर्जुन सुभेदार अर्थात अमित भानुशाली ( Amit Bhanushali ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. फोटो आणि मजेशीर व्हिडीओ नेहमी शेअर करत असतो. त्यामुळे तो त्याच्या कामाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळेही चर्चेत असतो. सध्या अमितचा रक्षाबंधनाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांना रुग्णालयात केलं दाखल, पाच दिवस आराम करण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला

“राखी सर्वांसाठी आहे…सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा…’ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर रक्षाबंधनाचा सण साजरा केला”, असं कॅप्शन लिहित अमितने ( Amit Bhanushali ) रक्षाबंधनाचा फोटो शेअर केला आहे. मालिकेत दाखवलेली बहीण अस्मिता म्हणजे अभिनेत्री मोनिका दाबाडेबरोबर अमितने रक्षाबंधन साजरे केले. मोनिकाने अमित व प्रतीक सुरेश (अश्विन)ला राखी बांधली. मोनिकाने बांधलेल्या राखीचा फोटो अमितने शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: “हे अमानवी कृत्य थांबवण्यासाठी आपण…”; कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणावर ऐश्वर्या नारकरांचं भाष्य, म्हणाल्या…

हेही वाचा – Video: ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार संदीप खरेंची मुलगी, खास पोस्ट करत म्हणाले, “लाडक्या लेकीची दुसरी मालिका…”

अमितच्या ( Amit Bhanushali ) या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच मालिकेतील अमितचं मोनिका म्हणजे अस्मिताबरोबर असलेल्या बहीण-भावाच्या नात्यांचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. “मी तुमच्या सारखं बहीण-भावाचं नातं पाहिलं नाही”, “परफेक्ट भाऊ-बहीण”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

सुभेदार कुटुंबासाठी यंदाचा रक्षाबंधनाचा सण फारच खास असणार आहे. प्रतिमा परत आल्यामुळे सुभेदार कुटुंबात आनंदाच वातावरण पसरलं आहे. बऱ्याच वर्षांनंतर प्रतिमा अर्जुनचे वडील प्रताप सुभेदारांना राखी बांधताना पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit bhanushali celebrate raksha bandhan 2024 pps