‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका जितकी चर्चेत असते तितकेच त्या मालिकेतील कलाकार मंडळी चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सायली, अर्जुन, पूर्णाआजी, साक्षी, चैतन्य अशी सगळी पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. त्यामुळे आता या भूमिकेद्वारे कलाकारांना ओळखलं जात आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. शूटिंगदरम्यानचे व्हिडीओ, किस्से चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. शिवाय वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी देखील शेअर करत असतात. त्यामुळेच ‘ठरलं तर मग’मधील कलाकार नेहमी चर्चेत असतात. अलीकडेच चैतन्य व साक्षीने म्हणजेच अभिनेता चैतन्य सरदेशपांडे व अभिनेत्री केतकी पालव यांनी शाहरुख खान व माधुरी दीक्षितच्या ‘ढोलना’ गाण्यावर सुंदर डान्स केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अर्जुन म्हणजेच अभिनेता भानुशालीच्या लेकाच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

हेही वाचा – “बाळा, तुला जाऊन ७३० दिवस…” सिद्धू मुसेवालाच्या आईची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “शत्रूंनी माझा एकुलता एक…”

अमित भानुशालीची पत्नी श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर मुलगा हृधानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये याच्या मनात काय आलं कळलं नाही आणि हा अचानक गायला लागला”, असं कॅप्शन लिहित हृधानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमितचा लेक डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाणं गाताना दिसत असून डान्स देखील करत आहे. त्याचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमितच्या चाहत्यांनी हृधानच्या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. “गोड…मी तुमच्या दोघांची खूप मोठी चाहती आहे”, “किती गोड आहे…कदाचित त्याने क्लिनिकमध्ये बाप्पाची मूर्ती पाहिली असेल”, “हा खूप गोड आहे…मोठा झाल्यावर हुबेहूब अमितसारखा दिसेल”, “छोटा अर्जुन सर”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी अमितच्या लेकाच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीला व रेवतीचं ‘हीरामंडी’तील लोकप्रिय गाण्यावर सुंदर शास्त्रीय नृत्य, पाहा व्हिडीओ

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या मधुभाऊंची सुटका करण्यासाठी अर्जुन-सायलीचे जोरदार प्रयत्न सुरू असून लवकरच कोर्टरुम ड्रामा सुरू होणार आहे. साक्षीविरोधात चैतन्यने शोधलेला महत्त्वाचा पुरावा अर्जुन कोर्टात सादर करणार आहे. शिवाय प्रकरणातील मोठी साक्षीदार शिवानी देखील साक्षीविरोधात साक्ष देणार आहे. त्यामुळे आता दोन महत्त्वाचे आरोप सिद्ध झाल्यानंतरही मधुभाऊ सुटणार का? आणि साक्षीला कठोर शिक्षा मिळणार का? हे पाहणं रंजक असणार आहे.

Story img Loader