‘इंडियन आयडॉल’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. सध्या या शोचे १४ वे पर्व चालू आहे. १९ वर्षांपूर्वी या शोचे पहिले पर्व आले होते. या पर्वाच्या फिनालेमध्ये चाहत्यांना अभिजीत सावंत आणि अमित साना यांच्यादरम्यान विजेतेपदासाठी झालेली चुरशीची लढत आजही आठवते. या शोचा विजेता अभिजीत सावंत ठरला होता, तर अमित उपविजेता ठरला होता. आता १९ वर्षांनंतर उपविजेता अमितने दावा केला आहे की चॅनलने अभिजीत सावंतला विजयी करण्यासाठी शेवटच्या तारखेच्या दोन दिवस आधी आपल्या व्होटिंग लाईन्स ब्लॉक केल्या होत्या.

सिद्धार्थ कन्ननशी बोलताना अमित म्हणाला की अभिजीतसाठी शोमध्ये टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा शिल्पा शेट्टीने एका एपिसोडमध्ये त्याच्या हास्याचं कौतुक केलं. “शिल्पाने अभिजीतचं कौतुक केल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली. माझ्या व्होटिंग लाइन शेवटच्या दिवसाच्या दोन दिवस आधी ब्लॉक करण्यात. कारण त्या आपोआप ब्लॉक होत नाही,” असं अमित म्हणाला.

“मी शूटिंगचा भाग नव्हतो”, नाना पाटेकरांनी मारलेल्या चाहत्याने दिली संपूर्ण घटनेबाबत प्रतिक्रिया; म्हणाला, “त्यांनी मला…”

राजकीय प्रभावामुळे अभिजीतला शो जिंकण्यात मदत झाली, असा उल्लेखही त्याने केला. अमित म्हणाला, “बर्‍याच लोकांचं म्हणणं आहे की त्या काळात शोवर राजकीय प्रभाव होता. असं लोक म्हणतात, पण मी स्वतः त्यावर संशोधन केलेलं नाही.” दरम्यान, अभिजीत राजकीय प्रभावामुळे जिंकल्याचं आधी अमित म्हणाला. नंतर स्वतःच त्याने चॅनेलच्या कृतींचे समर्थन केले आणि म्हटलं की त्यांना विजेता निवडण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कारण ही निवडणूक प्रक्रिया नव्हती जिथे त्यांना पारदर्शक असणं आवश्यक होतं. जवळपास दोन दशकांनंतर यावर बोलल्याबद्दल त्याने अभिजीतची माफी मागितली आणि दोघांमध्ये अजूनही प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असं सांगितलं.

दरम्यान, अमितने या शोचा दुसरा उपविजेता राहुल वैद्य याच्याबद्दलही भाष्य केलं. शोमध्ये आपण त्याला घाबरलो होतो, असा खुलासाही त्याने केला. शो दरम्यान दोघांमध्ये भांडणं झाल्याचंही त्याने उघड केलं. “शो दरम्यान आम्ही थोडे भांडायचो. तो मला भडकावण्यासाठी काही गोष्टी बोलत असे,” असं अमित म्हणाला. “राहुल इतर कोणाचाही विचार करत नाही, आधी स्वतःचा विचार करतो. त्याने शो दरम्यान क्रूचा अनादर केला. मला जेवढं समजलं त्यानुसार राहुलला इतरांवर वर्चस्व गाजवायला आवडतं. तो नेहमीच खूप ताकदवान लोकांच्या सोबत राहिला आहे. त्याचे राजकीय क्षेत्रात चांगले संबंध आहेत,” असा दावाही अमितने केला.

Story img Loader