झी युवा वाहिनीतर्फे ‘झी युवा सन्मान पुरस्कार २०२४’ देण्यात आले. या सोहळ्यात समाजातील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तरुणांना पुरस्कार दिले जातात. यावर्षीही विविध क्षेत्रांतील प्रयोगशील तरूणांना झी युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यादीत राजकारणातील एक नाव आहे, ते म्हणजे अमित राज ठाकरे. पुरस्कार मिळाल्यावर अमित ठाकरे यांनी केलेल्या विधानाने लक्ष वेधलं आहे.

झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात अमित ठाकरे यांनी एक वक्तव्य केले. वडील राज ठाकरे यांनी आपल्यासाठी अजूनही काय केलं नाही याबाबत अमित यांनी खंत व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर जाणून घेऊयात की अमित यांनी नेमकं काय म्हटलं आहे.

Kanyadaan Fame Marathi Actor
मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली! समुद्रकिनारी केलं प्री-वेडिंग शूट; होणारी पत्नी आहे सेलिब्रिटी छाया चित्रकार, पाहा फोटो
Jaya Bhattacharya Saves Puppy
श्वानाच्या दीड महिन्याच्या पिल्लावर वारंवार बलात्कार, अभिनेत्रीने केली…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
Sukh Mhanje Nakki Kay Asta fame Aparna Gokhale appear in savali hoin sukhachi serial
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झळकणार आता नव्या भूमिकेत, पोस्ट करत म्हणाली, “माझी नवी मालिका…”
reshma shinde send special gift to harshada khanvilkar
“तुझी आगाऊ मुलगी…”, म्हणत रेश्मा शिंदेचं हर्षदा खानविलकरांना खास पत्र, ‘लक्ष्मी निवास’च्या सेटवर पाठवलं गोड गिफ्ट
marathi actor swapnil rajshekhar remembering late actor and father rajshekhar
“आमचा सांता जाऊन १९ वर्षे…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत पोस्ट; म्हणाले, “पप्पा असताना…”
Marathi actor Kiran Mane post after announcing the first award in the name of Nilu Phule
“इंडस्ट्रीतल्या वर्चस्ववाद्यांनी माझ्या पोटावर मारलेली लाथ….”, निळू फुलेंच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले…
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

मुंबईतील एका हुक्का पार्लरवर पोलिसांची छापेमारी, मुनव्वर फारुकीसह १४ जणांना घेतलेलं ताब्यात, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

अमित ठाकरे काय म्हणाले?

या कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “माझ्या वडिलांनी मला नेहमी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. पण अजूनही त्यांनी माझ्यासाठी एक काम केलेलं नाही आणि ते म्हणजे मला एखादा कौतुकाचा मेसेज करणं. मी माझ्या वडिलांचा आदर करतो आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो. पण मला त्यांच्याकडून प्रोत्साहनाचा मेसेज मिळावा अशी माझी इच्छा आहे. कदाचित मी अजून कौतुक व्हावं असं काही केलं नसेल पण मी त्या दिवसाची वाट पाहीन.”

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं पाच दिवसांचं कलेक्शन १० कोटींहून कमी, जाणून घ्या एकूण आकडेवारी

अमित ठाकरेंच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी मनसेच्या विद्यार्थीसेनेच्या अध्यक्षपदापासून काम सुरू केलं. ते समाजातील तळागाळातील लोकांच्या व्यथा समजून घेत त्यांची मदत करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला असलेलं वलय अमित यांना वारसाने मिळालं असले तरी, आपल्या नेतृत्वगुण आणि वक्तृत्वशैलीने त्यांनी आपली युवानेते म्हणून ओळख निर्माण केली आहे. ‘झी युवा सन्मान पुरस्कार २०२४’ हा सोहळा रविवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Story img Loader