‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. तर आता या कार्यक्रमाचा पंधरावा सीझन सुरू आहे. या कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये एका स्पर्धकाला २५ लाखांसाठी ‘जंगल बुक’ या चित्रपटावरील प्रश्न विचारण्यात आला. परंतु त्याचं उत्तर त्याला देता आलं नाही.
या कार्यक्रमाच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आनंद राजू स्पर्धक म्हणून हॉटसीटवर बसले होते. राजू आनंद यांनी ६ लाख ४० हजार रुपयांच्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं. तर त्यानंतर त्यांनी १२ लाख ५० हजार ही जिंकले. यानंतर त्यांना २५ लाखांच्या प्रश्नासाठी खेळायचं होतं. पण या प्रश्नावर ते गोंधळले.
आणखी वाचा : ‘या’ रंगांचे कपडे परिधान करणे टाळतात अमिताभ बच्चन, ड्रेस डिझायनरने कारण देत केला खुलासा
“रुडयार्ड किपलिंग यांचं घर ‘नौलखा’ जिथे त्यांनी जंगल बुक लिहिलं, ते कोणत्या देशात आहे?” असा प्रश्न त्यांना २५ लाखांसाठी विचारण्यात आला. यासाठी A.अमेरिका B.पाकिस्तान C.युके D.श्रीलंका असे पर्याय होते. राजू यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित नव्हतं त्यामुळे त्यांनी ऑडियन्स पोल ही लाईफ लाईन घेतली. प्रेक्षकांनी त्यांना ‘D. श्रीलंका’ हा पर्याय लॉक करायला सांगितला. पण या उत्तरावर राजू समाधानी नव्हते. म्हणून त्यानंतर त्यांनी व्हिडिओ फोन ऑफ फ्रेंड ही लाईफ लाईन वापरली. पण व्हिडिओ कॉल वर ते त्यांच्या मित्राला हा प्रश्न समजाजू शकले नाहीत आणि ह्या लाईफ लाईनची वेळ संपली. यानंतर त्यांच्याकडे आणखी एक लाईफलाईन शिल्लक होती. परंतु त्या लाईफ लाईन बद्दलही त्यांना खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी हा खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केले नवीन घर, ‘अशी’ आहे ही आलिशान मालमत्ता
या प्रश्नाचे योग्य उत्तर राजू देऊ शकले नाहीत. पण त्यांनी हा खेळ सोडल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगत स्पष्टीकरण दिलं. या प्रश्नाचं योग्य उत्तर A. अमेरिका असं होतं.