बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे कायम चर्चेत असतात. सध्या त्यांचा क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती १५’ची जबरदस्त चर्चा आहे. गेली कित्येक वर्षा बिग बी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या लाखों करोडो चाहत्यांशी आणि स्पर्धकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमात बिग बी सगळ्यांबरोबरच अगदी दिलखुलासपणे गप्पा मारतात. खासकरून या खेळात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबरोबर मजा मस्ती करत ते हा खेळ पुढे नेतात.

‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सीझनमधील नव्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाशी गप्पा मारताना बिग बी यांनी काही वेगळ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. या नव्या भागात भाग घेतलेल्या एका स्पर्धकाने आपण आपल्या वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावत असल्याचे स्पष्ट केले. हर्ष शाह हे त्या स्पर्धकाचे नाव आहे. हर्ष यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांचा प्लास्टिक मोनोफिलामेंट यार्नचा व्यवसाय आहे, ज्याचा वापार भांडी घासायच्या स्क्रबमध्ये केला जातो.

आणखी वाचा : ‘शमशेरा’ फ्लॉप झाल्यावर रणबीरची मनस्थिती कशी होती? ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर आलिया भट्टचा खुलासा

याबद्दल माहिती देताना हर्ष यांनी बिग बी यांनाच सवाल केला की त्यांनी कधी भांडी घासली आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देताना अमिताभ म्हणाले, “होय, मी बऱ्याचदा भांडी घासली आहेत, खरकटी काढली आहेत, बाथरूम आणि तिथलं सिंकसुद्धा साफ केलं आहे, लोकांना असं का वाटतं की मी यापैकी काहीच काम केलं नसेल.”

अमिताभ बच्चन यांच्या या उत्तरावर एकच हशा पिकला. अशाप्रकारे हसत खेळत हा खेळ पुढे नेण्यात बच्चन माहिर आहेत अन् याची प्रचिती आपल्याला बऱ्याचदा आलेली आहे. सध्या अमिताभ बच्चन यांच्याकडे बरेच प्रोजेक्ट आहेत. नुकतंच ते टायगर आणि क्रीतीसह ‘गणपत’मध्ये झळकले. याबरोबरच कमल हासन, दीपिका पदूकोण आणि प्रभास यांच्यासह बिग बी ‘कल्कि २८९८ ईडी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. याबरोबरच रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटातही अमिताभ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader