बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी असंख्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. केवळ चित्रपटच नाही तर बिग बींच्या छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी नव्हते. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिसऱ्या पर्वाचे प्रतिनिधीत्व अभिनेता शाहरुख खानने केले होते.
हेही वाचा : मालदीवमध्ये सोनाली सेहगलचा बोल्ड अंदाज; पतीबरोबर शेअर केले रोमँटिक फोटो
ब्रिटीश शो ‘हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेयर’ या कार्यक्रमाचे भारतीय रुपांतर ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये करण्यात आले. भारतात ३ जुलै २००० साली या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्या कालखंडात अमिताभ बच्चन यांचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. याचदरम्यान ‘कौन बनेगा करोडपती’च्या निर्मात्यांनी बिग बींशी संपर्क साधला. पण, अमिताभ यांनी लगेच होकार न कळवता निर्मात्यांसमोर एक अट ठेवली.
हेही वाचा : नातवाच्या रिसेप्शनमध्ये धर्मेंद यांनी सादर केली भावुक कविता; अनुपम खेर व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, “धरमजी…”
अमिताभ यांना ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम होस्ट करण्याआधी ख्रिस टेरंट यांचा ‘हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेयर’ हा शो लाइव्ह पाहायचा होता. प्रत्यक्ष शो पाहिल्यावर बिग बींनी कार्यक्रमाची संपूर्ण रचना समजून घेतली त्यानंतर निर्मात्यांना होकार कळवला. याबद्दल मध्ये निर्माते सिद्धार्थ बासू यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ते म्हणाले, “अमिताभ यांचा होकार येण्यासाठी आम्ही खूप वाट पाहिली. त्यानंतर लंडनमधील मूळ शो पाहिल्यावर त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’साठी होकार कळवला.”
हेही वाचा : अजय देवगण नव्हे तर बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याचे केले काजोलने कौतुक; म्हणाली “तो पूर्ण काळजी…”
दरम्यान, गेली कित्येक वर्ष अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम होस्ट करीत आहेत. लवकरच या कार्यक्रमाचे १५ वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.