छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. बिग बी अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करतात. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकासह गप्पा मारत बिग बी कार्यक्रमात रंगत आणतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अमिताभ यांना स्पर्धकाने दिवाळीत फटाके वाजण्यावण्याबद्दल प्रश्न विचारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये जालंधर येथील रोहित गुप्ता यांनी बाजी मारुन हॉट सीटवर बसण्याची संधी मिळवली. रोहित यांनी बिग बींना ‘शुभ दीपावली’ असं म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी बिग बींना “दिवाळीतील फटाके फोडल्याने तुम्हाला उत्साह वाटतो”, असं मी ऐकलं आहे. यावर उत्तर देत बिग बी म्हणाले, “फटाके ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे तुम्ही लहान होता. माझ्या बालपणी फटाके विकत घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. तेव्हा आम्ही छोटे फटाके बॉम्ब विकत घ्यायचो. जेव्हा मी मोठा झालो आणि आमच्याकडे पैसे आले, तेव्हा आम्ही खूप सारे फटाके विकत घेऊन ते वाजवायचो”.

हेही वाचा >> Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत

“आम्ही घराच्या गच्चीवर फटाके फोडायचो. त्यामुळे आमच्यात आणि शेजाऱ्यांमध्ये कोणाच्या फटाक्यांचा जास्त आवाज येतो याची स्पर्धा व्हायची. त्यांनी चार फटाके फोडले तर आम्ही पाच फोडायचो. यामध्ये फटाक्यांसाठी खूप पैसे खर्च व्हायचे. परंतु, आता प्रदुषण होत असल्यामुळे आम्ही फटाके फोडत नाही. आता आम्ही घरी लक्ष्मी पूजन करतो. दिवाळीला नवीन कपडे घालतो आणि फक्त फुलबाजे वाजवतो. अभिषेकलाही फटाके वाजवायला आवडतात”, असंही बिग बी म्हणाले.

हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अ‍ॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा

रोहित यांनी केबीसीमध्ये ५० लाख जिंकले. परंतु, ७५ लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही. “ऑलिम्पिक जिंकलेल्या पहिल्या अमेरिकन महिलेचा जन्म भारतातील कोणत्या शहरात झाला होता?”, हा प्रश्न त्यांना ७५ लाखासाठी विचारण्यात आला होता. परंतु, या प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने त्यांनी खेळ सोडला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan says he loved bursting crackers kaun banega karodpati 14 kak
Show comments