‘कौन बनेगा करोडपती’चं सध्या १६वं पर्व सुरू आहे. नुकताच झालेला भाग हेतवी वासुदेव पटेलपासून सुरू झाला. हेतवी वासुदेव पटेलने आपल्या ज्ञानाच्या जोरावर १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. त्यानंतर पुण्याची आशी सिंह हॉट सीटवर बसली. केबीसीमध्ये येणं हे आशीच्या वडिलांचं स्वप्न होतं. वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशीचं आशीने हॉट सीटपर्यंत पोहोचून त्यांना हे गिफ्ट दिलं.
त्यानंतर आशी सिंहबरोबर अमिताभ बच्चन यांनी खेळ सुरू केला. ते १० हजार रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले. त्यावेळी अमिताभ बच्चन यांची आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेत ते बॅकबेंचर होते आणि मित्रांबरोबर सतत गप्पा मारायचे, याबाबत बिग बींनी सांगितलं.
अमिताभ बच्चन म्हणाले, “मी एक बॅकबेंचर होता. मला नेहमी असं वाटायचं की, शिक्षक गृहपाठ बघणार नाहीत. मागे बसून मी आणि माझे मित्र गप्पा मारायचो. संपूर्ण वेळ आम्ही गप्पा मारून काढायचो.” त्यानंतर बिग बींनी आशीला विचारलं की, क्लासदरम्यान भूक लागली आणि १५ मिनिटांची वेळ बाकी असेल तर काय करशील? तर आशी म्हणाली, “मी १५ मिनिटांसाठी मन आणि शरीरावर नियंत्रण ठेवेल.”
आशीच्या उत्तरांवर अमिताभ बच्चन म्हणाले की, आमच्यासाठी मन आणि शरीरावर नियंत्रण करणं गरजेचं नव्हतं. आम्ही त्यावेळी सॅण्डविच किंवा बिस्किट काढून गुपचूप खायचो. पुस्तक तोंडाजवळ धरून खायचो. त्यामुळे आम्ही अभ्यास करतोय, असं वाटायचं.
हेही वाचा – “जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
दरम्यान, अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचा २७ जूनला ‘कल्कि २८९८ एडी’ (Kalki 2898 AD) चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. आता बिग बी ‘कल्कि २८९८ एडी’ चित्रपटाच्या पुढच्या भागात देखील झळकणार आहेत. ‘कल्कि’ व्यतिरिक्त अमिताभ रजनीकांत यांच्यासह ‘वेट्टैयन’ चित्रपटात पाहायला मिळाले. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता.
© IE Online Media Services (P) Ltd