सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे १४ वे पर्व सुरु आहे. मागील अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत आहेत. हॉटसीटवर बसलेल्या व्यक्तीशी गप्पा मारत ते हा बुद्धीचातुर्याचा खेळ पुढे नेत असतात. यामुळे स्पर्धकाचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रेक्षकांचे अधिक मनोरंजन होते. अनेकदा ते चित्रपट, काम, सिनेसृष्टी अशा विषयांवर बोलताना त्याच्या आयुष्यातले किस्से सांगू लागतात. असाच एक गमतीदार किस्सा त्यांनी ‘केबीसी’च्या एका भागामध्ये सांगितला. या भागामध्ये त्यांच्यासमोर साहिल शिंदे नावाचा स्पर्धक बसला होता.

या भागाचा प्रोमो व्हिडीओ सोनी टिव्ही वाहिनीच्या इन्स्टाग्राम हँडलवर नुकताच पोस्ट करण्यात आला. खेळ सुरु असताना अमिताभ यांनी शाळेतली आठवण सांगितली. ते म्हणाले, “माझ्या बहिणीची शाळा माझ्या शाळेपासून काहीशा अंतरावर असलेल्या टेकडीवर होती. या दोन टेकड्यांमध्ये दरी होती. तेव्हा दरी ओलांडून मी त्या शाळेमध्ये माझ्या प्रेयसीला शोधायला जायचो.” हे ऐकून उपस्थित प्रेक्षक हसायला लागले. साहिलने देखील यावर प्रतिक्रिया दिली. ‘तुम्ही तर प्लेयर आहात सर’, असे तो म्हणाला. यावर बिग बी काहीसे लाजले.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…

आणखी वाचा – भेदभाव नष्ट करणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या ऐतिहासिक निर्णयाचं शाहरुख खानने केलं कौतुक; ट्वीट करत म्हणाला…

त्यानंतर त्यांनी साहिलला ‘तुमच्या आयुष्यात कोणी आहे का?’ असे हसत विचारले. तेव्हा लाजत त्याने ‘नाही सर’ म्हटले. पुढे स्क्रीनवर साहिलच्या मित्रांचा व्हिडीओ सुरु झाला. त्यांनी ‘साहिलच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आहे’ असे म्हणत त्याचे गुपित सर्वांना सांगितले. व्हिडीओ संपल्यावर अमिताभ त्याला उद्देशून “महोदय या मंचावर खोटं बोलायचं नसतं. चला तर सांगून टाका कोण आहे ती भाग्यशाली व्यक्ती”, असे म्हणाले. हे ऐकल्यावर साहिल पुन्हा एकदा लाजला.

आणखी वाचा – “जर स्टार १०० कोटी घेत असेल तर…” अभिनेत्यांच्या कोटींच्या मानधनावर सुभाष घाई यांनी केली खरमरीत टीका

मध्यंतरी एका भागामध्ये अमिताभ यांनी त्यांच्या ‘मुकद्दर का सिंकदर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगितला होता. या चित्रपटाच्या एका दृश्यामध्ये त्यांना विनोद खन्नांच्या तोंडावर ग्लासामध्ये असलेले पाणी फेकायचे होते. पण अनावधानाने काचेचा ग्लास त्यांच्या हातामधून निसटला आणि विनोद यांच्या हनुवटीवर आदळला. त्या अपघातामध्ये त्यांच्या हनुवटीवर काही टाके पडले होते.

Story img Loader