अमिताभ बच्चन आणि त्यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. मध्यंतरी या कार्यक्रमात एका स्पर्धकाने बच्चन यांच्याबरोबर खूप धमाल केली. भूपेंद्र चौधरी या स्पर्धकाने धमाल करत अमिताभ बच्चन यांच्याबरोबर हा खेळ खेळले आणि तिथल्या लोकांचंही मनोरंजन केलं. त्यांचा उत्साह पाहून बिग बीदेखील हैराण झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या एपिसोड दरम्यान भूपेंद्र यांनी बच्चन यांना बरेच खासगी प्रश्नदेखील विचारले. भूपेंद्र यांना शाळेत त्यांच्या मैत्रिणी शाहरुख खान म्हणत असत तर त्यांनी बच्चन यांनासुद्धा प्रश्न केला की त्यांच्या वर्गमैत्रिणी त्यांना कोणत्या नावाने हाक मारायच्या? यावर बिग बी मस्करीत उत्तर देत म्हणाले, माझ्या वर्गमैत्रिणी मला उंट म्हणायच्या. अशा बऱ्याच आठवणींना बच्चन यांनी उजाळा दिला.

आणखी वाचा : जिमला दांडी न मारणाऱ्या रणबीरचं ट्रेनरने केलं कौतुक, म्हणाला “त्याच्याकडे कारण असूनही…”

मध्यंतरी अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या प्रेमाचासुद्धा खुलासा झाला होता. अमिताभ आणि रेखा यांच्यातील नातेसंबंध सगळ्यांनाच ठाऊक आहेत, पण त्यांच्यात पुढे काहीच न झाल्याने नंतर अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याशी विवाह केला. पण या दोघींच्याही आधी बच्चन यांच्या आयुष्यात एक महाराष्ट्रीयन मुलगी होती.

अमिताभ यांचे मित्र दिनेश कुमार यांनी मध्यंतरी या गोष्टीचा खुलासा केला होता. बच्चन जेव्हा कलकत्तामध्ये होते तेव्हाचा हा किस्सा आहे. अमिताभ ज्या कंपनीत काम करायचे तिथे त्यांची एका मराठी मुलीशी ओळख झाली होती. तिचं नाव होतं चंदा. अमिताभ आणि त्यांचं तब्बल ३ वर्षं नातं टिकलं होतं. अमिताभ यांना तिच्याशी लग्नदेखील करायचं होतं. नंतर अभिनयाच्या प्रेमापोटी अमिताभ कलकत्ता सोडून मुंबईत आले आणि त्यांची ही कहाणी अधुरीच राहिली. नंतर त्या मुलीने एका प्रसिद्ध बंगाली अभिनेत्याशी लग्नकेलं. अमिताभ बच्चन यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय आणि ‘केबीसी’च्या माध्यमातूनही ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan wanted to marry this marathi girl before jaya bachchan and rekha avn