एखाद्या मालिकेला प्रसिद्धी मिळण्यासाठी प्रत्येक पात्र हे मुख्य पात्राइतकेच महत्त्वाचे असते. सकारात्मक, नकारात्मक, लहान-मोठी अशी सगळीच पात्रे मालिकेतील प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवण्याचे काम करतात. झी मराठी या वाहिनीवर अप्पी आमची कलेक्टर(Appi Aamchi Collector) ही मालिका अशाच मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अगदी छोट्या अमोलपासून सगळी पात्रे प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात. सध्या मालिकेत लहानग्या अमोलच्या आजारपणाचे कथानक पाहायला मिळत आहे. आता झी मराठीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये अमोल त्याच्या आजारपणाला मोठ्या धाडसाने सामोरे जाण्याचे ठरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा प्रोमो

‘झी मराठी’ वाहिनीने ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, अमोलचे केस गळत असल्याचे घरातील सर्वांच्या लक्षात येते. अर्जुन म्हणतो, “केमोथेरपीचा डोस दिल्यामुळे अमोलचे केस गळणार.” अप्पी म्हणते, “अमोलचे केस कमी करण्याचा निर्णय घेतलाय आम्ही.” अमोल मोठ्याने म्हणतो, “नाही कापायचे केस माझे, नाही कापायचे.” याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अर्जुन अमोलला म्हणतो, “तुला काय वाटतं, तुझा बाबा तुला एकट्याला केस कापून देईल?” अमोलचे वडील, मामा, काका, दोन्ही आजोबा असे सगळे केस कापायला बसले असून म्हणतात, “कापा आमचे केस.” ते पाहून अमोल, “तुम्ही का कटिंग करताय?”, असे म्हणत सगळ्यांना उठवतो आणि म्हणतो, “आता मी या आजाराला हरवणार. मला केस नसले तरीही क्युटी दिसलं पाहिजे क्युटी.” हे बोलताना तो भावूक झालेला असून अर्जुन-अप्पीदेखील भावूक होताना दिसत आहेत.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अमोलच्या ट्रीटमेंटमध्ये त्याचं कुटुंब देणार त्याची साथ!”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत मालिकेचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. “खूप छान कल्पना केली आहे. खरंच लहान मुलांवर अशी वेळ आल्यावर मुलं किती घाबरतात. पण, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून अमोलवर जी प्रक्रिया दाखवत आहात ती खरंच खूप छान आहे. अमोल तू, असाच स्ट्रॉंग मुलगा राहा.” “अमोल लवकर बरा हो बाळा, तुझ्यामुळे सीरियल एक नंबर वाटते.” “हा सीन बघितल्यावर खूप इमोशनल वाटलं. खूप छान सीरियल आहे”, “सिंबा, तू बरा होशील. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत”, “खरंच खूप छान मालिका आहे”, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मालिकेचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार अंकिता वालावलकरला म्हणाला ‘हडळ’, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

दरम्यान, अमोल बरा होणार का, मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol decides will beat disease after watching promo appi aamchi collector marathi serial audience also get emotional netizens reacts nsp