Amruta Bane and Shubhankar Ekbote : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा शाही विवाहसोहळा एप्रिल महिन्यात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने अभिनेत्री अमृता बनेने ‘लग्नाची सहामाही’ असं कॅप्शन देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय या पोस्टबरोबर अभिनेत्रीने लग्नातील एक Unseen व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.

दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं नाव मराठी कलाविश्वात अतिशय सन्मानाने घेतलं जातं. शुभंकर हा अश्विनी एकबोटेंचा लेक आहे. शुभंकरने आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कन्यादान’मुळे त्याची आणि अमृताची ( Amruta Bane ) ओळख झाली. एप्रिल महिन्यात ऑनस्क्रीन नवरा-बायकोची भूमिका साकारणारी ही जोडी खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली. आज या जोडप्याच्या लग्नाला ६ महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने अमृताने काय पोस्ट लिहिली आहे पाहूयात…

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”
suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…

हेही वाचा : भेटला विठ्ठल माझा…; सूरज पोहोचला केदार शिंदेंच्या घरी! ‘गुलीगत किंग’ला दिली खास भेटवस्तू, Video एकदा पाहाच

Amruta Bane : अमृता बनेची नवऱ्यासाठी खास पोस्ट

लग्नाची सहामाही Six Months

शाळेत बर असायचं… सहामाही ( सेमिस्टर ) परीक्षा येणार म्हटल्यावर भीतीचं वातावरण जरी असलं… तरी, त्याआधी चाचणी परीक्षा म्हणजे युनिट टेस्ट झालेली असायची. एकंदर काय त्यामुळे परीक्षेचा सराव झालेला असायचा. पण, लग्नाचं तसं नक्कीच नाही. कितीही जुने, जाणते विद्यार्थी असोत किंवा हुशार विद्यार्थी असोत लग्न म्हटलं की, त्या अनुषंगाने येणाऱ्या कोणत्याच परीक्षांचा सराव झालेला नसतोच आणि लग्नाच्या परीक्षेत येणारे प्रश्न हे सिलॅबस बाहेरचेच येतात.(ज्यांची सहामाही ते पुढील सगळ्या परीक्षा देऊन झाल्या आहेत त्यांना हे नक्कीच पटलं असेल)

त्यामुळे आपल्या लग्नाला सहा महिने झाले असले तरी, वार्षिक परीक्षा, दुसरा दिवाळी पाडवा, तिसरा दसरा, चौथी वटपौर्णिमा, पाचवा गणेशोत्सव, सहावं ह्यांव… सातवं त्याव अशा खूप भारी गोष्टी बाकी आहेत. संस्मरणीय, अमुक आणि तमुक… लग्नाचा अभ्यासक्रम कसाही असो… शुभंकर तुझी मनापासून आजन्म साथ आणि तुझा प्रेमळ हात नेहमी हातात असेल तर सगळा पेपर नक्की सोपा जाईल.

हेही वाचा : प्रियांका चोप्राबरोबर अफेअरच्या चर्चा; पत्नी ट्विंकल घर सोडून गेल्यावर अक्षय कुमारने घेतलेला मोठा निर्णय, २००५ मध्ये नेमकं काय घडलेलं?

दरम्यान, अमृताने ( Amruta Bane ) शेअर केलेल्या पोस्टवर शुभंकरने “Happiest सहामाही Partner” अशी कमेंट केली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader